Pune: पुणे: पोलीस ठाण्यातच कॉन्स्टेबल आणि शिपाई भिडले, फाईलवरून हाणामारी – pune two constables from shivajinagar allegedly fought at the cyber crime police station


पुणे : शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयातील पुणे सायबर पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये मारामारीचा प्रकार नुकताच घडला. पोलिस हवालदार आणि पोलिस शिपाई यांच्यामध्ये हाणामारी झाली असून फाईल देण्या-घेण्यामधून हा प्रकार घडला.

सायबर पोलिस ठाण्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी करोनाग्रस्त झाल्याने या विभागाला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच हा प्रकार घडला आहे. संबंधित पोलिस हवालदारावर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याने त्याने सर्वांसमक्ष सहकारी पोलिस शिपाई यांना बेदम मारहाण केल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. हा प्रकार घडल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेमधील दोषी कर्मचाऱ्यावर कारवाई न करता, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांना विचारले असता, याबाबत आपणास काहीही माहिती नाही. संबंधित विभागाकडून माहिती घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आणखी बातम्या वाचा:

मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग

मुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

संतापजनक! ड्युटीवरून परतणाऱ्या नर्सवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! मुलानेच मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खून, मृतदेह फेकला होता नदीतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *