pm narendra modi birthday: Live पंतप्रधानांचा वाढदिवस : राहुल गांधी, कंगना रानौतनंही दिल्या शुभेच्छा – live pm narendra modi 70th birthday


नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस आहे. या निमित्तानं भारतीय जनता पक्षाकडून देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात याहीत वेगवेगळ्या राज्यांतील भाजपचे कार्यकर्ते सेवा सप्ताह सोहळा राबवत आहेत.

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना देश-विदेशातून शुभेच्छा मिळत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन, कोसळलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी अशा वेगवेगळ्या मुद्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिनेदेखील एका व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून रानौत कुटुंबीयांची भाजपशी वाढलेली जवळीकही दिसून येत आहे.

वाचा :टाटा कंपनी बांधणार संसदेची नवीन इमारत, ८६२ कोटीत जिंकले कॉन्ट्रॅक्ट
वाचा :सर्वपक्षीय बैठक संपली; चीन मुद्द्यावर राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत निवेदन देणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *