Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त ; पेट्रोलियम कंपन्यांनी केली दर कपात


मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली. आज पेट्रोल आणि डिझेल १३ ते २० पैशांनी स्वस्त झाले आहे.

आजच्या दर कपातीने मुंबईत पेट्रोल दर प्रती लीटर ८८.०८ रुपये आहे. तर डिझेल ७८.०८५ रुपये झाले आहे. पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.४० रुपये असून डिझेलचा भाव ७२.३७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.४४ रुपये असून डिझेल ७७.७३ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.९२ रुपये आहे. डिझेल ७८.८५ रुपये प्रती लीटरपर्यंत घसरले आहेत.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरणीमुळे देशांतर्गत इंधन दरात कपात सुरु आहे. याआधी बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये कोणताही बदल केला नाही. तर त्याआधी मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १७ पैसे आणि डिझेलमध्ये २२ पैशांची कपात केली. तर सोमवारी पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले होते.

चिंता वाढली; टाळेबंदीचा तिजोरीला फटका,कर संकलनात मोठी घट
पेट्रोलियम कंपन्यांनी मागील सहा दिवसांत चार वेळा इंधन दर कमी केल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले.१६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला होता.

‘हे’ फक्त टाटाच करू शकतात; करोना काळात कर्मचाऱ्यांना २३५ कोटींचा बोनस
एडीबीने पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे वाटचाल करेल, असेही आपल्या एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक या अहवालात नमूद केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जीडीपी सध्याच्या पातळीपेक्षा ८ टक्क्यांनी वाढेल. माणसांचे चलनवलन आणि व्यावसायिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जीडीपी वाढण्यास मदत मिळणार आहे.

अर्थव्यवस्था गाळात ; तरीही गव्हर्नर म्हणतात सर्व आव्हानांसाठी RBI सज्ज
अग्रिम करासह एकूण प्राप्तिकराचे संकलन चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत २२.५ टक्के घसरले आहे. १५ सप्टेंबरपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, हे संकलन २,५३,५३२.३० कोटी रुपये झाले आहे. प्राप्तिकर विभागाच्या मुंबई क्षेत्राकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली आहे. याच काळात, १५ सप्टेंबर २०१९ पर्यंत एकूण कर संकलन ३,२७,३२०.२० कोटी रुपये झाले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *