national unemployment day: राहुल गांधींकडून पंतप्रधानांना प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा; मग कोपरखळी! – pm narendra modis birthday congress leader rahul gandhi and other wish pm twitter trend national unemployment day


नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सकाळीच सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. सकाळी ७.१५ च्या सुमारास राहुल गांधी यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असं ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच बेरोजगारीच्या मुद्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस (#NationalUnemploymentDay) ट्रेन्डमध्ये सहभागी होत त्यांनी मोदी सरकारला कोपरखळी मारलीय.


वाचा :… मग काय ‘भाभीजी के पापड’ खाऊन करोना जातो का? राऊत राज्यसभेत बरसले
वाचा :उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘मोठ्या प्रमाणात बेरोजगारीमुळे तरुणांना आज राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करावा लागतोय. रोजगार हा सन्मान आहे. सरकार केव्हापर्यंत हा सन्मान देण्यापासून मागे हटत राहणार?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारलाय.

७० व्या वाढदिवसानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज देश – विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’च्या रुपात साजरा केला जातोय. बेरोजगारीच्या मुद्यावर सोशल मीडियावर सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याचमुळे ट्विटवरवर #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस आणि #NationalUnemploymentDay असे दोन ट्रेन्डही सध्या पाहायला मिळत आहेत.

वाचा :करोनाबाधितांचा आकडा ५१ लाखांच्या पुढे, पुन:संक्रमणाने वाढवली चिंता
वाचा :प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; लेटेस्ट सेरो सर्व्हेने दिली खुशखबरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *