Narendra Modi Took Loan From China Even When Indian Soldiers Were Dying At Borders – ढोंगी केंद्राने चीनच्या बँकेकडून कर्ज घेतले, काँग्रेसचा आरोप


म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

गलवान खोऱ्यात २० भारतीय सैनिक सीमेचे रक्षण करून हौतात्म्य स्वीकारत असताना, लडाखच्या सीमेवरील तणावावरून भारत-चीन आर्थिक संबंध संपविण्याच्या ढोंगीपणाच्या आडून केंद्रातील मोदी सरकार चीनच्या बँकेकडून कर्जाचा दुसरा हप्ता घेत होता, अशी टीका बुधवारी काँग्रेसने केली. लडाखच्या सीमेवर चिनी सैन्याच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले असत्य विधान लपविण्यासाठी केंद्र सरकारला वारंवार खोटे बोलावे लागत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला.

चीनच्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून भारताने ८ मे रोजी ५०० दशलक्ष डॉलरचा कर्जाचा पहिला हप्ता स्वीकारला आणि १९ जूनला ७५० दशलक्ष डॉलरचा दुसरा हप्ता घेतल्याचे मंगळवारी मोदी सरकारने संसदेत मान्य केले. १९ जून उजाडेपर्यंत लडाखच्या सीमेवर चीनच्या सैन्याशी लढताना भारताच्या २० जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. ही तीच १९ जून आहे ज्या दिवशी पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान देशाशी खोटे बोलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सीमेत घुसखोरी केल्यावरून केवळ चीनला क्लीनचीटच दिली नाही, तर बीजिंग येथील एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेतून पैसेही घेतले, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.

वाचा :लडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध
वाचा :भारत चीन तणाव : लडाखमध्ये दीर्घ मुक्कामाची तयारी
देशातील सर्वसामान्यांना चीनच्या सामानाच्या बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या आणि चीनसोबत आर्थिकदृष्ट्या संबंध संपवायच्या गोष्टी करणाऱ्या मोदी सरकारचे ढोंग यातून उघड झाले आहे. स्वतःची वेळ आली तेव्हा मोदी सरकारने चीनच्या बँकेकडून पैसे घेतले. या बँकेत २६.६ टक्के मताधिकारासह सर्वात मोठा समभागधारक चीन आहे. सीमेवरील तणावामुळे चीनशी नेहमीसारखे व्यावसायिक संबंध ठेवता येणार नाही, या मतावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अजूनही ठाम आहेत काय, असा सवाल खेडा यांनी केला. असतील तर पंतप्रधान मोदी चीनसोबत काय करीत आहेत, याचे त्यांनी उत्तर द्यावे. पंतप्रधान मोदींवर चीनचा कोणता दबाव आहे? या दबावामुळेच मोदींनी १९ जून रोजी चीनला क्लीनचीट दिली काय? याच दबावाखाली पीएम केअर्स निधीत चिनी कंपन्यांकडून देणग्या घेऊन त्यांचा तपशील उघड करण्यास नकार देत आहेत काय? असे सवाल खेडा यांनी केले.

वाचा :जगाला शहाणपणा शिकवू नका, भारताची पाकला चपराक
वाचा :राजौरीत पाककडून गोळीबार, भारतीय जवान शहीद

पंतप्रधानांवर कोणाचा दबाव आहे?

चीनकडून गेल्या सहा महिन्यांत भारतीय सीमेत कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात केले आहे. यापेक्षा धक्कादायक आणखी कोणते विधान असू शकत नाही. आधी पंतप्रधान १९ जून रोजी खोटे बोलतात. मग संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ७ ऑगस्टला चीनच्या घुसखोरीचे सत्य स्वीकारून ते लगेच हटविले जाते. ही माहिती हटविण्यासाठी पंतप्रधानांकडून दबाव आला असेल, असे आम्ही मानतो आणि पंतप्रधानांवर कोणाचा दबाव आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे पवन खेडा म्हणाले.

वाचा :सर्वपक्षीय बैठक संपली; चीन मुद्द्यावर राजनाथ सिंह राज्यसभेत निवेदन देणार
वाचा :‘सुदर्शन न्यूज’च्या इस्लामोफोबिक ‘यूपीएससी जिहाद’ कार्यक्रमावर बंदीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *