Maratha reservation: मराठा संघटना आक्रमक! मुंबई, पुण्याकडे जाणारे दूध अडवले – maratha reservation: protesters stop milk tankers heading towards pune, mumbai


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणप्रकरणी सकल मराठा समाज संघटना आक्रमक झाली आहे, राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी गुरुवारी सकाळी मुंबई व पुण्याकडे जाणारे दूध अडवण्यात आले. यावेळी ठिय्या आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाल्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील निर्णय होईपर्यंत नोकरभरती थांबवावी, विद्यार्थ्यांना सध्या शिक्षणात मिळणाऱ्या सवलती कायम ठेवाव्यात अशी मागणी सकल मराठा समाजाने केली होती. पण त्या मागणीकडे दुर्लक्ष करत सरकारने पोलिस भरतीचा निर्णय घेतला. यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई व पुण्याकडे जाणारे दूध अडवण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलन: सांगलीत पोलिसांच्या नोटिसांमुळे तणाव

सकाळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते गोकुळ शिरगाव येथील दूध संघाच्या कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी प्रवेशव्दारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तेथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळाने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक व पोलिसांत झटापट झाली. शेवटी सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाचा: ‘कंगनाच्या ऐवजी राज्य सरकार करोनाच्या मागे लागले असते तर…’

दरम्यान, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे नेते दिलीप पाटील व सचीन तोडकर यांनी दिला आहे. मंगळवारी महाविकास आघाडी सरकारचे श्राध्द घालण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

वाचा: वह तूफान बन कर आएगा… युवक काँग्रेसच्या मोदींना ‘अशा’ शुभेच्छाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *