Kapila Vatsyayan: कलाभ्यासक कपिला वात्स्यायन यांचे निधन – kapila vatsyayan passes away


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

कला इतिहास, वास्तुकला आणि भारतीय शास्त्रीय नृत्य यांच्या प्रसिद्ध अभ्यासक कपिला वात्स्यायन (वय ९२) यांचे त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी बुधवारी निधन झाले. लोधी स्मशाघाटावर दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुलमोहर एनक्लेव्ह येथील निवासस्थानी सकाळी ९ वाजता त्यांचे निधन झाले, असे इंडिया इंटरनॅशनल सेंटरचे (आयआयसी) सचिव कंवल अली यांनी सांगितले. या केंद्राच्या त्या आजीव विश्वस्त होत्या. त्या आयआयसीच्या आशिया प्रकल्पाच्या अध्यक्षही होत्या. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या त्या संस्थापक संचालक होत्या. कपिला वात्स्यायन यांचा जन्म सन १९२८मध्ये दिल्लीत झाला होता. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली होती. तसेच त्यांनी अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातूनही पदव्यत्तर पदवी घेतली होती. सन २०११मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी कला आणि इतिहासावर सुमारे २० पुस्तके लिहिली.

वाचा :तिरुपतीच्या खासदारांचे करोनाने निधन, PM मोदींकडून शोक व्यक्त
वाचा :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करोनाबाधित, ट्विट करून दिली माहितीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *