Infosys Started Salary Hike, Promotion, And Offering New Jobs – कंपनी असावी तर अशी; पगार वाढ, बढती आणि नवी नोकर भरती


नवी दिल्ली: करोना व्हायरसच्या काळात मोठ मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. अशाच भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने मात्र कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. ईटी नाऊशी बोलताना इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी एक मोठी घोषणा केली.

वाचा- ‘हॅपिएस्ट माइंड्स’ची आज नोंदणी; विश्लेषकांचा अंदाज, मिळणार इतका बंपर नफा

करोना संकट असताना देखील या इन्फोसिस कर्मचाऱ्यांना पगार वाढ आणि प्रमोशन देणार आहे. या शिवाय जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नवी नोकर भरती देखील करण्याचा विचार कंपनी करत असल्याचे CEO पारेख यांनी सांगितले. सध्या कंपनीत २.४ लाख कर्मचारी काम करत आहेत. करोना काळात एप्रिल महिन्यात कंपनीने पगार वाढ आणि प्रमोशन संदर्भातील निर्णय स्थगित केला होता.

वाचा- ‘हे’ फक्त टाटाच करू शकतात; करोना काळात कर्मचाऱ्यांना २३५ कोटींचा बोनस

एप्रिल महिन्यात इन्फोसिसने म्हटले होते की, पगार वाढ आणि प्रमोशन होणार नाही. पण ज्या लोकांना नोकरीची ऑफर दिली गेली आहे. त्यांना नोकरी नक्की मिळेल. तेव्हा ज्या लोकांना कंपनीचे ऑफर लेटर मिळाले होते त्यांची भरती सुरू आहे. जून ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनी फ्रेशर्सना नोकरी देत आहे.

वाचा- अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी खासगी क्षेत्राकडून ही अपेक्षाः RBI गव्हर्नर

इन्फोसिस शिवाय Cognizant आणि Capgemni या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पगार वाढ आणि प्रमोशन दिले आहे. पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार इन्फोसिस अमेरिकेत १२ हजार नव्या लोकांना नोकऱ्या देणार आहे.

वाचा- अंबानींचा नवा विक्रम; सर्व सरकारी कंपन्यांपेक्षा रिलायन्सची संपत्ती अधिक

करोना काळात काही भारतीय कंपन्यांनी कर्मचारी कपात न करण्याचा निर्णय घेतला होता. यात टाटा ग्रूपचा समावेश देखील होता. सोमवारीच टाटा स्टीलने कर्मचाऱ्यांना २३५.५४ कोटी रुपये बोनस म्हणून वाटले जाणार असल्याचे जाहीर केले. ही रक्कम २४ हजार ७४ कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाणार आहे. जमशेदपूर युनिटमधील ट्यूब डिव्हिजनच्या १२ हजार ८०७ कर्मचाऱ्यांना १४२.०५ कोटी रुपये मिळतील. तर बाकीचे ९३.४९ कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या ११ हजार २६७ कर्मचाऱ्यांमध्ये वाटले जातील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *