India China border news: भारत-चीन सीमेवर गेल्या २० दिवसांत तीन वेळा गोळीबार – Three Firing Incidents Between India-China In Last 20 Days In Eastern Ladakh


वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात मॉस्कोमध्ये झालेल्या भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील चर्चेच्या आधी भारतीय सैनिकांना घाबरवण्यासाठी चिनी सैनिकांनी पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरून इशारा देताना, हवेत गोळीबार केला होता. अधिकृत सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. हा प्रकार फिंगर ४ येथील रिजलाइन भागात झाला. या ठिकाणी भारतीय लष्कराने सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील सामरिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली अनेक पर्वतशिखरे काबीज करून त्या ठिकाणी आपले सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली होती. या वेळी चिनी सैनिक एका भारतीय तुकडीच्या दिशेने चाल करून गेले. मात्र, सावध असलेली भारतीय तुकडी त्यांचा सामना करण्यासाठी उभी ठाकल्यानंतर चिनी सैनिक काही वेळाने मागे गेले, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. तब्बल ४५ वर्षे भारत आणि चीन यांच्यातील सीमा शांत राहिल्यानंतर गेल्या वीस दिवसांत या सीमेवर तीन वेळा गोळीबार झाला आहे.

या दिवशी झाला गोळीबार

– २९ ते ३१ ऑगस्ट – पँगाँग तळ्याच्या दक्षिण काठावर

– ७ सप्टेंबर – मुखपारी शिखरांजवळ

– ८ सप्टेंबर – पँगाँग तळ्याच्या उत्तर काठाजवळ

वाचा :भारत चीन तणाव : लडाखमध्ये दीर्घ मुक्कामाची तयारी
वाचा :लडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध

‘पँगाँग तळ्याच्या दक्षिण काठावर चिनी सैन्याच्या घुसखोरीचा प्रयत्न २९ ते ३१ ऑगस्टच्या दरम्यान भारतीय लष्कराने हाणून पाडला, तेव्हा चिनी सैन्याने प्रथमच गोळीबार केला. गोळीबाराची दुसरी घटना सात सप्टेंबरला मुखपारी शिखरांच्या परिसरात घडली. तिसऱ्या घटनेवेळी आठ सप्टेंबरला पँगाँग तळ्याच्या दक्षिण काठावर दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी सुमारे १०० गोळ्या झाडल्या,’ अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.

मॉस्कोमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात तणाव निवळण्यासाठी वाटाघाटी होण्याआधी लडाख सीमेवर हा गोळीबार सुरू होता. दोन्ही देशांमध्ये कोअर कमांडर पातळीवरील चर्चा करण्याचे दोन्ही नेत्यांमध्ये निश्चित झाले होते; मात्र या बैठकींची तारीख आणि वेळ याबाबत चीनने सोयीस्कर मौनच बाळगले आहे. भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान कोंगरूंग नाला, गोगरा आणि पँगाँग तळ्याचा फिंगर भाग या ठिकाणी एप्रिलपासून संघर्षाचे वातावरण आहे.

वाचा :चार वर्षात १६०० भारतीय कंपन्यांत चीनमधून थेट विदेशी गुंतवणूक
वाचा :केंद्राने चीनच्या बँकेकडून कर्ज घेतल्याचा आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *