coronavirus vaccine news: अमेरिकेतही लवकरच करोनावर लस? ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य – coronavirus vaccine us donald trump says vaccine could be ready in a month


वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने अमेरिकेत थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत करोनाचा मुद्दा प्रमुख आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाच्या लशीवर मोठे वक्तव्य केले आहे. येत्या तीन-चार आठवड्यात करोनाची लस मिळणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

मंगळवारी पेन्सिलवेनियामध्ये ‘एबीसी न्यूज’ने आयोजित केलेल्या मतदारांशी चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मागील प्रशासनाच्या काळात अन्न आणि औषध प्रशासन व अन्य प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन लस विकसित करण्यास एक वर्षाचा कालावधी जात होता. आम्ही मात्र हा कालावधी कमी केला आहे. येत्या काही आठवड्यातच लशीबाबत चांगली बातमी समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या तीन-चार आठवड्यातच लस विकसित होईल असेही त्यांनी सांगितले.

वाचा: संकट काळातील मित्र! रशियाकडून भारताला मिळणार लशीचे ‘इतके’ डोस

ट्र्म्प यांनी पुढे सांगितले की, करोनाचा प्रभाव कमी होत आहे. करोनावर लस सापडली नसतानाही करोनाचा संसर्ग कमी होत आहे. लॉकडाउनमुळे आम्ही जवळपास २५ लाखांहून अधिक अमेरिकन नागरिकांचे प्राण वाचवले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प प्रशासनाला करोनाच्या संसर्गाला हाताळण्यात अपयश आले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो. मात्र, हे आरोपच निराधार असल्याचे ट्रम्प यांनी याआधीच म्हटले होते. निवडणुकीच्या काही दिवसांआधीच अमेरिकेत लस उपलब्ध होणार असल्याची चर्चा सुरू आहे. लस वितरण आणि लशीकरण मोहिमेसाठी तयारी करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. येत्या तीन नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

वाचा: लस मिळाल्यानंतरही पुढील वर्षभर जनजीवन पूर्वपदावर नाही!

वाचा: करोना: १५० हून अधिक लशींवर संशोधन; ‘अशी’ आहे लस विकसित करण्याची पद्धत

रशियाने ऑगस्ट महिन्यातच लशीला मंजुरी देऊन जगात खळबळ उडवून दिली होती. रशियाच्या दाव्यावर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेे होते. ऱशियाची ‘स्पुटनिक व्ही’ लस रशियन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली असून पहिली खेप वितरीत करण्यात आली आहे. तर, भारतासह इतर देशांनाही रशियन लस मिळणार आहे.

वाचा: करोना: रशियात सामान्य नागरिकांसाठी लशीची पहिली खेप उपलब्ध

दरम्यान, अमेरिकेत करोनाच्या संसर्गावर डिसेंबर अखेरीस पर्यंत लस सर्वांसाठी उपलब्ध होईल असे फायजर कंपनीने म्हटले होते. सध्या सुरू असलेल्या लस चाचणीचे परिणाम अतिशय सकारात्मक असल्याचे कंपनीने म्हटले. फायजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले की , या वर्षाच्या अखेरपर्यंत करोनाला अटकाव करणारी लस उपलब्ध होईल. फायजर कंपनी बायोएनटेकसोबत (BioNTech) संयुक्तीरीत्या लस विकसित करत आहे.

वाचा: करोना: तोंडावाटे आणि नाकातून देण्यात येणारी लस प्रभावी ठरणार!

न्यूयॉर्कमधील फायजर आणि जर्मनीची बायोएनटेक कंपनीने विकसित केलेली लस सध्या लस चाचणीत आघाडीवर आहे. त्याशिवाय, मॉडर्ना इंक आणि एस्ट्राजेनका पीएलसी या लशींही स्पर्धेत असून त्यांची चाचणी सुरू आहे. अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले की, ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रायोगिक लशीची परिणामकता जाणून घेण्यासाठी ६० टक्के संधी आहे. अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयावरही लशीचे भवितव्य अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *