Tata Projects Ltd: टाटा कंपनी बांधणार संसदेची नवीन इमारत, ८६२ कोटीत जिंकले कॉन्ट्रॅक्ट – tata projects ltd wins contract to build new parliament building


नवी दिल्लीः दिल्लीत नवीन संसद भवन बांधण्याचे काम टाटा कंपनीला मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने प्रारंभिक बोली जिंकली आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने बुधवारी ८६१.९० कोटी रुपये खर्चाने नवीन संसद भवन बांधण्यासाठी बोली लावलीय. तर एल अँड टी लिमिटेडने ८६५ कोटींची बोली सादर केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

आम्ही एल 1 बिड जिंकली आहे. टाटाने यासाठी सुमारे ८६२ कोटी रुपये अपेक्षित खर्च सादर केला आहे. तर एल अँड टीने ८६५ कोटी खर्च सांगितला आहे. पण ही अंतिम बोली नाही, असं टाटा कंपनीने म्हटलं आहे.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) आर्थिक बोली सुरू केलीय. यामध्ये टाटा प्रोजेक्ट लिमिटेडने ८६१.९० कोटी रुपयांची बोली लावली. तर लार्सन अँड टुब्रोने ८६५ कोटींची बोली लावली. टाटाची बोली कमी आहे. त्यामुळे टाटा कंपनीला नवीन संसद भवन बांधण्याचं काम मिळेल हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय.

दिल्लीतील सध्याची संसद भवन इमारत खूप जुनी झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरक्षेसंदर्भातील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने संसदेची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

विद्यमान इमारतीजवळ नवीन संसद भवन बांधण्यात येईल. या भवनचे बांधकाम केंद्रीय व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत तयार केले जाईल. नवीन संसद भवनाचे बांधकाम येत्या २१ महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. नवीन संसदेची इमारत भूखंड क्रमांक ११८ वर बांधली जाईल, असं केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं (CPWD) म्हटलंय.

लडाखच्या डोंगराळ वाळवंटात १७ हजार फुटांवर आता भारतीय लष्कराचा पाण्यासाठी शोध

विद्यमान संसद आपले काम सुरू ठेवेल आणि दुसरीकडे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू राहील, असं सीपीडब्ल्यूडीने सांगितलं. संसद भवनची नवीन इमारत बांधण्यासाठी तीन बांधकाम कंपन्या आर्थिक बिड सादर करण्यास पात्र मानल्या गेल्या आहेत, असं यापूर्वी सीपीडब्ल्यूडीने म्हटलं होतं. यामध्ये लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), टाटा प्रोजेक्ट्स, शापूरजी पालनजी अँड कंपनीचा समावेश आहे. मात्र, आता टाटा प्रोजेक्टला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सर्वपक्षीय बैठक संपली; चीन मुद्द्यावर राजनाथ सिंह राज्यसभेत गुरुवारी निवेदन देणार

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी केंद्रीय व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत संसद भवनाची नवीन इमारत तयार केली जाणार आहे. विद्यमान संसद भवनाजवळ ही इमारत प्लॉट नंबर ११८ वर बांधली जाईल. ही इमारत तळघरसह दोन मजल्यांची असेल. सीपीडब्ल्यूडीच्या म्हणण्यानुसार हे बांधकाम२१ महिन्यांत पूर्ण होईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *