suicide: Suicide: करोनाला हरवल होतं; होम क्वारंटाइनमध्ये केली आत्महत्या – pune man commits suicide in home quarantine


पुणे: करोनावर मात करून होम क्वारंटाइन झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. पुणे शहरातील सहकारनगर भागात हा प्रकार घडला. नैराश्येतून ही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( Coronavirus In Pune Latest News )

वाचा: धक्कादायक: लॉकडाऊनने बेकार केले; नागपुरात एकाच दिवशी ३ आत्महत्या

संदीप नागनाथ भोसले (वय ४५, रा. ओमकार पार्क, सहकारनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सहकारनगरमध्ये संदीप हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांच्या वडिलांना देखील करोनाची लागण झाली होती. त्यांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यानंतर काही दिवसांमध्येच संदीप यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांचे कुटुंब अधिकच चिंतेत होते.

वाचा: कुठे नेऊन ठेवले पुणे आमचे; करोनाच्या वाढीमुळं सत्ताधारी भाजपवर टीका

करोनाची लागण झाल्यानंतर संदीप यांनी त्यावर उपचार घेतले. डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार संदीप पद्मावती येथील ओमकार सोसायटीमधील आपल्या घरी राहत होते. त्यांनी पत्नी आणि दोन मुलांना आपल्या सासरी सोडले होते. संदीप यांचा भाऊ मंगळवारी सकाळी नाश्ता घेऊन त्यांच्या घरी आल्यावर, संदीप यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना दिसले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. संदीप यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

वाचा: दहा वर्षाच्या चिमुकलीची कमाल; करोना आणि डेंग्यूवर केली मातSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *