SBI decide OTP base atm withdrawal: रात्री एटीएममधून पैसे काढताय; ‘SBI’ने घेतलाय हा निर्णय – sbi decide otp based atm facility for day and night


वृत्तसंस्था, मुंबई : भारतीय स्टेट बँकेने स्वतःच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरू केलेल्या ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) आधारित सुविधेची व्याप्ती वाढवली आहे. आता येत्या शुक्रवारपासून ही सुविधा अहोरात्र उपलब्ध होणार असल्याची माहिती स्टेट बँकेने मंगळवारी दिली. यामुळे १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम बँकेच्या एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी आधारित सुविधा १८ तारखेपासून २४ तास मिळणार आहे.

ही सुविधा वापरण्यासाठी स्टेट बँकेच्या ग्राहकांनी आपले मोबाइल क्रमांक बँकेकडे नोंदवावेत किंवा पूर्वीचे क्रमांक बदलले असतील, तर ते अद्ययावत करावेत, असे आवाहनही बँकेने केले आहे. करोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातही आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, ग्राहकांचे आर्थिक गैरव्यवहारांपासून संरक्षण करणे; तसेच अनधिकृत व्यवहारांवर वचक ठेवण्यासाठी बँकेने ही ओटीपी आधारित सुविधा चोवीस तास पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी १ जानेवारी २०२० रोजी स्टेट बँकेने ओटीपी आधारित एटीएम सेवा सकाळी ८ ते रात्री ८ अशी १२ तासांसाठी सुरू केली होती.

अर्थव्यवस्थेला सावरली ; करोना संकटात मध्यमवर्ग आला धावून
ही सुविधा अहोरात्र केल्यामुळे एटीएममधील सुरक्षा यंत्रणाही अधिक प्रभावी करता येणार आहे. ग्राहकांची सुरक्षितता आणि सोय पाहण्यात बँकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यासाठी नवनवे तंत्रज्ञान स्वीकारून विविध सुरक्षा उपाययोजनाही बँक सातत्याने करत असते, असे बँकेच्या रिटेल व डिजिटल बँकिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी यांनी सांगितले.

वाचा : तेजीची झळाळी कायम ; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने
ओटीपी आधारित एटीएम सुविधा

– ही सुविधा केवळ स्टेट बँकेच्या डेबिट कार्डधारकांसाठीच असून या सुविधेअंतर्गत १० हजार रुपये व त्यापेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढता येणार आहे.

– ही सुविधा केवळ स्टेट बँकेच्याच एटीएममध्ये उपलब्ध राहणार आहे.

– एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक वेळी ग्राहकाला त्याच्या डेबिट कार्डाचा पिन क्रमांक टाकल्यानंतर त्यासोबत ओटीपीदेखील टाकावा लागणार आहे. हा ओटीपी ग्राहकाच्या मोबाइलवर बँकेतर्फे पाठवला जाणार आहे.

– एटीएम यंत्रात डेबिट कार्ड घालून पिन टाकल्यावर नेमकी किती रक्कम काढायची ते टाइप केल्यावर एटीएम यंत्राकडूनच ओटीपीची मागणी केली जाणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *