nitin gadkari tested covid 19 positive: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करोनाबाधित, ट्विट करून दिली माहिती – nitin gadkari tested covid 19 positive


नवी दिल्लीः केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकर हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गडकरींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलीय.

आपल्याला कालपासून काहीसा अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. यानंतर आपण डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांचा सल्ला घेतला. त्यांच्या सल्ल्यानंतर आपण करोना चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आर्शीवादामुळे सध्या माझी प्रकृती चांगली आहे. मी स्वतःला आयसोलेट केलं आहे, असं नितीन गडकरी यांनी ट्विट करून सांगितलं.

आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनी काळजी घ्यावी. करोना संदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करावं, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *