Nagpur crime: Nagpur Crime: चाकूने वार करून पोलिसाला ठार मारण्याचा प्रयत्न; नागपूर हादरलं – man with a criminal background attacks cop with knife


नागपूर: रेती चोरी प्रकरणात भावाला अटक केल्याने संतप्त झालेल्या गुन्हेगाराने चाकूने सपासप वार करून पोलीस हेडकॉन्स्टेबलला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री कन्हान येथे घडली. जखमी हेडकॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक असून, त्याला नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ( Nagpur Crime Latest News )

वाचा: ATMमधून बघता बघता त्याने लाखो रुपये काढले, व्हिडिओ झाला व्हायरल

रवींद्र चौधरी (वय ४०), असे जखमी हेडकॉन्स्टेबलचे तर कमलेश मेश्राम (वय ३५) असे हल्लेखोराचे नाव आहे. कमलेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. तीन दिवसांपूर्वी रेती चोरी प्रकरणात चौधरी यांनी कमलेश याच्या भावाला अटक केली. त्यामुळे कमलेश हा संतापला होता. बुधवारी रात्री कन्हानमधील एका चौकात कमलेश याने रवींद्र यांना गाठले. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले व पसार झाला. याबाबत माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

वाचा: धक्कादायक! मुलानेच मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खून, मृतदेह फेकला होता नदीत

पोलिसांनी जखमी रवींद्र यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लगेचच नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला कन्हानमधील डॉक्टरांनी दिली. त्यानंतर जखमी रवींद्र यांना शंकरनगर चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. कन्हान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून कमलेश याचा शोध सुरू केला आहे.

वाचा: मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंगSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *