Mumbai crime: मुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग – mumbai crime minor girl molesting at quarantine centre in mankhurd


मुंबई: मुंबईत कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच, मानखुर्दमध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये एका करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा जंतुनाशक फवारणी करणारा कर्मचारी आहे. क्वारंटाइन सेंटरमधील करोनाबाधित १७ वर्षीय मुलीचा त्याने विनयभंग केला. रिपोर्टनुसार, ९ सप्टेंबर रोजी ही मुलगी करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तिला मानखुर्द येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी आरोपी तरूण क्वारंटाइन सेंटरमध्ये गेला होता. आरोपीने या करोनाबाधित मुलीचा विनयभंग केला. तिने विरोध केला असता, त्याने तिच्या कानशिलात लगावली, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

पीडित मुलीने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली. त्यांनी तातडीने मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास सुरू आहे.

आणखी बातम्या वाचा:

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

संतापजनक! ड्युटीवरून परतणाऱ्या नर्सवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! मुलानेच मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खून, मृतदेह फेकला होता नदीत

धक्कादायक! ‘लिव्ह-इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

जास्त पैसे खर्च केल्याने पतीने हटकले; पत्नीने पळवून पळवून मारलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *