Mhada transit camp: ठाण्यातील ‘त्या’ वसाहतींचा पुनर्विकास तीन वर्षातच; आव्हाड यांची घोषणा – mhada will redevelop transit camps in three years in thane


मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गेली ९ वर्षे पाठपुरावा केलेला वर्तक नगर पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आपणाला यश आले आहे. मंगळवारी झालेल्या निर्णयानुसार या पोलीस वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्यात येणार असून आगामी तीन वर्षात या इमारतींचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, गेली ९ वर्षे तीन सरकारांकडे पाठपुरावा केल्यानंतर आव्हाड यांच्याकडे गेलेला हा प्रश्न त्यांनी अवघ्या पहिल्याच बैठकीत मार्गी लावला. आव्हाडामुळेच पोलीस कुटुंबियांना न्याय मिळाला याचा आपणाला अभिमान आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे रखडलेला वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीच्या पुन:र्वसनाचा प्रश्न गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अवघ्या एकाच बैठकीत निकाली काढला आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी बोलावल्या पत्रकार परिषदेत आव्हाड आणि सरनाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे हेदेखील उपस्थित होते. गेली अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून सरनाईक वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी पाठपुरावा करीत होते. त्यांनी आपणाशी चर्चा केल्यानंतर आपण हा प्रश्न धसास लावला. योगायोगाने आपण सदर खात्याचे मंत्री असल्याने त्यांच्या या पाठपुराव्याला पूर्णविराम लावणे मला शक्य झाले. हा पुन:र्विकास कोणी करावा या मुद्यावर अनेकांचा विरोध होता. मात्र, आपण हा विरोध झुगारुन सदरचा भूखंड हा म्हाडाचा असल्याने म्हाडाच्या वतीनेच पुनर्विकास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ५६७ घरे ही पोलिसांना देण्यात येणार असून उर्वरित घरांपैकी आणखी १० टक्के घरे पोलिसांसाठीच राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच, अन्य १० टक्के घरे ही शासकीय कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. लवकरच या पुनर्विकासासाठी वास्तूविशारद- अभियंते यांच्यासोबत आराखडा तयार करून आगामी तीन वर्षात हे काम पूर्णत्वास नेण्यात येणार आहे, असं आव्हाड म्हणाले.

मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

तर, गेल्या ९ वर्षांपासून आपण वर्तक नगरमधील पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील होतो. इमारती धोकादायक झाल्यामुळे येथील अनेक कुटुंबांचे रेंटल हाऊसिंगमध्ये स्थलांतर करण्यात आलेला आहे. फडणवीस सरकारच्या काळातही आश्वासने देण्यात आली होती. मात्र, आव्हाड यांच्याशी महिन्याभरापूर्वी पत्रव्यवहार केला. त्यांनीही म्हाडा आणि गृहखात्याची संयुक्त बैठक बोलावून हा प्रश्न तत्काळ मार्गी लावला. एकाच बैठकीमध्ये त्यांनी येथील पुनर्विकासाला मान्यता दिली. या वसाहतीत पोलिसांसाठी गेस्ट हाऊस, हॉल, क्लब हाऊस आदींची व्यवस्था करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली.

शिवसेना-भाजप आमनेसामने येणार; बीएमसीतील ‘या’ निवडणुकांना परवानगी

‘सर्व नसते उद्योग भाजपवाल्यांनी महाराष्ट्रासाठी राखून ठेवले आहेत’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *