Maratha reservation issue: उदयनराजेंनी मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करावं; मेटेंचं आवाहन – shivsangram organisation leader vinayak mete appeal udayanraje bhosale to lead maratha reservation issue


बीड: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणच्या आंदोलनाचं नेतृत्व करावं, असं आवाहन शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलं आहे.

चाकूर तालुक्यातील बोरगाव येथील किशोर कदम या युवकाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. विनायक मेटे यांनी आज कदम कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मेटे यांनी उदयनराजे भोसले यांना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करण्याचं आवाहन केलं. मराठा आरक्षणलाा सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. त्यानंतरही राज्य सरकारने काहीच हालचाल केली नाही. पाच-सहा दिवस उलटून गेले आहेत. पोकळ आश्वासनापलिकडं या सरकारकडून मराठा समाजाला कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आश्वासनं पोकळ असल्याची टीका मेटे यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला पाहिजे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या व्यतिरिक्त पवारांनी मराठा आरक्षणावर काहीच भाष्य केलं नाही. ते बोलायलाही तयार नाहीत, अशी टीकाही मेटे यांनी केली. या पार्श्वभूमीवर आता उदयनराजे यांनीच आता मराठा आरक्षणसााठी पुढाकार घ्यावा. मराठा समाजाच्या भल्यासाठी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवून नेतृत्व करावे. राज्यातील संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करेल, असं त्यांनी सांगितलं. मराठा आंदोलन सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे. समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी ठोस भूमिका असायला हवी. एकवाक्यता असायला हवी. कृती आराखडा असायला हवा. त्यासाठी कुणी तरी पुढाकार घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

मराठा समाज आता एकटा नाही, मी सोबत आहे; उदयनराजे कडाडले

चव्हाणांनी राजीनामा द्यावा

दरम्यान, यावेळी त्यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार केला. अशोक चव्हाण यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळेच आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे चव्हाण यांनी याची जबाबदारी घेऊन स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणीही मेटे यांनी केली.

‘शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात; मराठा आरक्षणावर का नाही?’

Chandrakant Patil: राज्य सरकार मराठा समाजाला उल्लू बनवतंय: चंद्रकांत पाटीलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *