Madhu Mangesh Karnik: मधु मंगेश कर्णिक यांची करोनावर मात – madhu mangesh karnik defeated karona


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी वयाच्या ८९व्या वर्षी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांना अंधेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर यापूर्वी बायपास सर्जरी झाली आहे. येथील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून त्यांना करोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर कर्णिक आता घरी परतले आहेत.

रुग्णालयात जाण्याअगोदर त्यांनी ‘प्राप्तकाल’ ही कादंबरी लिहायला सुरुवात केली होती. आता ही कादंबरी पू्र्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणखी एक महिनाभर त्यांना कुणी संपर्क करू नये, अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *