Lockdown Crisis: धक्कादायक: लॉकडाऊनने बेकार केले; नागपुरात एकाच दिवशी ३ आत्महत्या – three unemployed youth commits suicide in nagpur


नागपूर:लॉकडाऊन काळात सर्वांनाच आर्थिक फटका बसला. अनेकांना रोजगारास मुकावे लागले. त्यामुळे आर्थिक घडीच विस्कटून गेली. अशाचप्रकारे लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तीन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नागपुरात उघड झाले असून हळहळ व्यक्त होत आहे. या तीन वेगवेगळ्या घटना असल्या तरी बेरोजगारी हे यामागील एकच कारण असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ( Maharashtra Lockdown Crisis Latest News )

वाचा: करोना: रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; राज्याने ओलांडला ११ लाखांचा टप्पा

पहिली घटना नागपूर शहरातील कपिलनगर म्हाडा क्वार्टर येथे आज सकाळी उघडकीस आली. योगेश नरेंद्र मोहोड (वय ३०) हा ऑटोरिक्षा चालवायचा. योगेश हा आई सहजा यांच्यासोबत राहायचा. लॉकडाऊनमुळे ऑटोरिक्षाचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे तो बेरोजगार झाला होता. नैराश्येतून त्याला दारुचे व्यसन जडले आणि त्यातच मंगळवारी रात्री योगेश याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. आज सकाळी सहजा यांना योगेश हा गळफास लावलेला दिसला. त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी जमले. माहिती मिळताच कपिलनगर पोलिस तेथे पोहोचले. पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी योगेश याच्या भावाची हत्या करण्यात आली होती.

वाचा: अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी खासगी क्षेत्राकडून ही अपेक्षाः RBI गव्हर्नर

दुसरी घटना नंदनवनमधील मिरे ले-आऊट येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेश धनराज लताड (वय २८) हा इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करायचा. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. तो बेरोजगार झाला. बेरोजगारीला कंटाळून बुधवारी सकाळी त्याने दुपट्ट्याने गळफास घेतला व जीवन संपवले.

तिसरी घटना हुडकेश्वरमधील गजानननगर परिसरात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास समोर आली. सूरज रमेश आसोले (वय ३०) यानेही पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. बेरोजगारीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तिन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

वाचा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करोनाबाधित, ट्विट करून दिली माहितीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *