Jammu Kashmir News: राजौरीत पाककडून गोळीबार, भारतीय जवान शहीद – Pakistan Violated Ceasefire In Sunderbani Sector Jammu And Kashmir Naik Aneesh Thomas Lost His Life


जम्मू : जम्मू – काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजुनं गोळीबार करण्यात आले तसेच पाकिस्ताननं भारताच्या दिशेनं मोर्टारही डागले. यामध्ये भारतीय लष्कराच्या १६ कोरमध्ये तैनात नायक अनिश थॉमस हा जवान शहीद झाला आहे. तसंच एका अधिकारी आणि दोन जवान गंभीररित्या जखमी झाले आहेत. सेनेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबनी सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. भारतीय सेनेनंही या गोळीबाराला योग्य प्रत्यूत्तर दिलं.


वाचा :पाक अधिकाऱ्याचा खोडसाळपणा, अजित डोवाल संतापले!
वाचा :चार वर्षात १६०० भारतीय कंपन्यांत चीनमधून थेट विदेशी गुंतवणूक

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोणत्याही चिथावणीविना शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं छोट्या हत्यारांच्या माध्यमातून गोळीबार केला. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, या गोळाबारात सेनेच्या एका अधिकाऱ्यासहीत तीन जवान जखमी झाले. यातील अनिश थॉमस या गंभीररित्या जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू झाला. इतर जखमींवर सेनेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतानं दिलेल्या प्रत्यूत्तराचा फटका पाकिस्तानलाही बसल्याचं समजतंय. पाकिस्तानी सेनेचे काही जवान या प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे परंतु, अद्याप याविषयी विस्तृत माहिती मिळालेली नाही.

वाचा :चिन्यांना लडाखच्या कडाक्याच्या थंडीतही चोख प्रत्युत्तर देणार, भारतीय लष्कराची तयारी पूर्ण
वाचा :‘संपूर्ण देश सैन्यासोबत, पण चीनविरोधात PM मोदी कधी उभे राहणार?’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *