ipl 2020: ‘आयपीएलमधील बायो-बबल म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखे आहे’ – delhi capital’s opener shikhar dhawan said, living in bio bubble is like living in the big boss’s house


करोना व्हायरसमुळे यावर्षी युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळत आहे. या गोष्टींमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ती बायो बबल सिक्युरिटी. कारण खेळाडूंना आपल्या हॉटोलपासून ते मैदानापर्यंत सुरक्षित राहता यावे, मैदानात खेळता यावे, यासाठी ही प्रणाली उपयोगात आणली आहे. पण बायो-बबल म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रीया आयपीएलमधील एका दिग्गज खेळाडूने व्यक्त केली आहे.

वाचा-अर्जुन सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्कडून खेळणार? जाणून घ्या सत्य…

खेळाडूंची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना बायो-बबलमध्ये ठेवण्यात येते. कोणताही व्हायरस खेळाडूंच्या जवळ येणार नाही, याची काळजी बायो-बबल घेत असते. पण त्यासाठी बायो-बबलचे काही नियमही आहेत आणि त्यांचे पालन करणे हे सर्वात महत्वाचे आहे. जर एखाद्या खेळाडूने बायो-बबलच्या नियमांचे पालन केले नाही, तर त्याला संघाबरोबर राहता येत नाही. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात येते आणि ती चाचणी निगेटीव्ह आल्यावरच त्याला बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जातो.

वाचा-पाहा चिमुकला ख्रिस गेल, भन्नाट षटकारांचा व्हिडीओ झालाय व्हायरल

बायो-बबलबद्दल दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर शिखर धवन म्हणाला की, ” आमच्यासाठी बायो-बबल ही एक नवीन गोष्ट आहे. आम्ही त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहोत. बायो-बबल म्हणजे राहणं म्हणजे एका आव्हानासारखेच आहे. बायो-बबलचे काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळावेच लागतात. तुम्ही स्वत:हून अन्य काही गोष्टी करू शकत नाहीत. बायो-बबलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला स्वत:ला फिट ठेवणे गरजेचे आहे.”

शिखर धवन

धवन पुढे म्हणाला की, ” बायो-बबलमध्ये राहणं म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखे मला वाटत आहे. कारण बायो-बबल ही पूर्ण वेगळीच गोष्ट आहे. यामध्ये आपण सुरक्षित राहण्यासाठी काय करू शकतो, याचा विचार मी करत असतो. तुम्ही कोणत्या व्यक्तीशी कसा संवाद साधता, यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत. जर तुमच्याबरोबर १० लोकं असतील, पण तुम्ही जर एकमेकांचे मित्र नसाल तर तुम्ही एकमेकांना मदत करू शकत नाहीत. कारण जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखत नसाल तर त्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकत नाही किंवा त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. त्यामुळेच बायो-बबल हे मला वेगळेच वाटत आले आहे.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *