India Nepal border: नेपाळची जमीन भारताने बळकावली; विद्यार्थ्यांमध्ये भारताविरोधात अपप्रचार! – india nepal border nepal government publish book on border dispute for school education


काठमांडू: नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांच्या सरकारकडून भारतविरोधी कारवाया सुरूच आहे. भारताने नेपाळच्या भूभागाचा ताबा घेतला असल्याचा दावा नेपाळ सरकारकडून करण्यात येत असताना आता हाच अपप्रचार विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा आधार घेण्यात येणार आहे. याद्वारे नेपाळ सरकार आता भारतविरोधी विचार नवीन पिढीमध्ये रुजवत असल्याची चर्चा आहे.

लिपुलेख, कालापानी आणि लिपिंयाधुरी या भागांना घेऊन भारत आणि नेपाळमध्ये वाद सुरू आहे. नेपाळने भारताच्या हद्दीतील भूभागावरही दावा केला आहे. या दाव्याला आणखी बळकटी यावी यासाठी नेपाळने घटनेत दुरुस्ती करून नवीन नकाशाला मंजुरी दिली. यामुळे भारत आणि नेपाळमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेपाळमधील एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळचा भूभाग आणि सीमा संबंधीचा अभ्यासक्रम शालेय विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. पाठ्यक्रम विकास मंडळाने सांगितले की, याद्वारे नेपाळचे भाग आणि सीमा क्षेत्रातील माहिती दिली जाणार आहे.

वाचा: भारतात बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून संबंध चांगले होणार नाहीत: नेपाळ
शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री गिरिराज मणी पोखरेल यांनी सांगितले की, हे पुस्तक नेपाळची निर्मिती आणि एकीकरण, शेजारील देशांसोबतचे संबंध, सीमा वाद आदींबाबतची माहिती दिली जाणार आहे. सीमेच्या संरक्षणासाठी आवश्यक माहिती, ज्ञान, कौशल्य आणि विचारांना विकसित करण्यासह देशाची भौगोलिक अखंडता कायम ठेवण्याचा उद्देशय असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:देशाच्या राजकारणात चीनची लुडबुड; नेपाळने ‘असा’ लावला चाप

वाचा: नेपाळची शिरजोरी; लिपुलेखातील घुसखोरी योग्य असल्याचा केला दावा

पाठ्यक्रम विकास केंद्गाचे महासंचालक केशव दहल यांनी सांगितले की, नेपाळच्या उत्तर-पश्चिम सीमेवरील लिम्पियाधुरी, कालापानी आणि लिपुलेखसह नेपाळी भूमीवर भारताने केलेले अतिक्रमण आणि त्याच्याशी निगडीत ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, तथ्ये पुस्तकात मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

नेपाळच्या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा आदी भाग हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. हे भाग भारताकडे आहेत. लिपुलेख या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. नेपाळचा हा नवीन नकाशा सर्व शासकीय विभाग आणि शाळांमध्ये वापरण्यात येणार आहे. नेपाळने भारताच्या ३९५ चौकिमी क्षेत्रफळावर दावा करताना लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी भागाशिवाय गुंजी, नाभी आणि कुटी गावांचाही समावेश केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *