coronavirus: करोनाबाधित पोलिसांची संख्या २० हजारांवर – the number of police affected by coronation is over 20,000


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पोलिस दलातील करोना संसर्गाचा वेग काही केल्या कमी होताना दिसत नाही. राज्यामध्ये आतापर्यंत २० हजारांहून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली असून २०४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

करोनाशी लढणाऱ्या पोलिस दलाची चिंता दिवसागणिक वाढत आहे. नियंत्रणात आलेली उपताराधीन रुग्णाची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. राज्य पोलिस दलातील ४४७ अधिकारी आणि तीन हजार २८१ कर्मचारी सध्या करोनावर उपचार घेत आहेत. आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या २० हजारच्या पुढे गेली असून त्यापैकी १६ हजार ७१ पोलिस करोनावर मात करून परतले आहे. यातील बहुतांश पोलिस पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. २० अधिकारी आणि १८४ कर्मचारी यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. पोलिसांमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्येही करोनाची लागण होत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. याच भीतीने अनेक पोलिस आपल्या कुटुंबियांपासून दूर राहत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *