corona update in india: धोका वाढला! करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा ‘करोना’ – corona update in india : noida, mumbai healthcare workers are confirmed cases of reinfection


नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या वेगात गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झालेली दिसून येतेय. अशा वेळी दिल्ली आणि मुंबईतून करोना संबंधी धक्कादायक अशी माहिती समोर येतेय. नोएडा आणि मुंबईमध्ये करोनातून बरे झालेले काही रुग्ण पुन्हा एकदा करोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे. यामध्ये नोएडाच्या दोन तर मुंबईच्या चार आरोग्यसेवेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिल्लीतल्या सीएसआयआरच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिमोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी’च्या (IGIB) संशोधनात हा खुलासा झालाय.

दुसऱ्यांदा संक्रमण : देशात पहिल्यांदाच आलं समोर

दिल्लीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिमोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी’च्या संशोधनात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, नोएडाच्या एका रुग्णालयातील दोन आरोग्यसेवा कर्मचारी पुन्हा एकदा संक्रमित आढळले. दुसऱ्यांदा संक्रमण आढळलेलं हे देशातील पहिलंच प्रकरण असू शकतं.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, IGIB च्या टीमनं मुंबईच्या ४ आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा करोना संक्रमण आढळल्याचं म्हटलंय. यातील तीन जण मुंबई सेंट्रल भागातील नायर रुग्णालयाचे तर माहिमच्या हिंदुजा हॉस्पीटलशी निगडीत असल्याचं समोर आलंय. मुंबईतील हे परिणाम सहा दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय मेडीकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.

दुसऱ्यांदा करोना संक्रमणाच्या चाचणीसाठी IGIB च्या एका टीमनं आत्तापर्यंत देशाभरात १६ आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या सॅम्पल्सची गंभीरतेनं चाचणी केली. यातील दोन स्वॅब सॅम्पल्समधून एकात पहिल्यांदाच संक्रमण झाल्याचं तर दुसऱ्यात दुसऱ्यांदा संक्रमण झाल्याचं समोर येतंय.

वाचा :करोना रुग्णांची एकूण संख्या ५० लाखांवर, तर ८२ हजारांहून अधिक मृत्यू
वाचा :कधी येणार करोनावर लस? आरोग्य मंत्रालयाने दिले संसदेत उत्तर

व्हायरसमध्ये आढळली भिन्नता

नोएडा आरोग्य कर्मचारी प्रकरणात एका २५ वर्षीय पुरुष आणि एका २८ वर्षीय महिलेच्या चाचणीत दोन SARS-CoV2 व्हायरस दरम्यान नऊ भिन्नता आढळल्या, ज्यामुळे त्यांच्यात दुसऱ्यांदा संक्रमण आढळलंय. ‘एचसीडब्ल्यू’नं ५ मे आणि १७ मे रोजी पहिल्यांदा पीसीआर पॉझिटिव्ह टेस्ट केली. दुसऱ्यांदा क्रमश: २१ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी चाचणी करण्यात आली.

ग्रेटर नोएडातल्या ‘गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ डॉ. राकेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडात पुन्हा करोनाबाधित आढळलेले दोन्ही आरोग्यसेवा कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात आले होते. यातील एकावर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर दुसऱ्याला त्याच्या घरीच आयसोलेट करण्यात आलंय.

दुसऱ्यांदा संक्रमण कसं होतं?

रुग्णाच्या शरीरात करोना व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता नेहमीसाठी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे जशी रोगप्रतिकारक क्षमता थोडी कमी पडते तेव्हाच शरीरात उपस्थित करोना व्हायरस शरीरावर पुन्हा एकदा हल्ला चढवतो. अशावेळी रुग्ण दुसऱ्यांदा संक्रमित होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरना संक्रमणातून मुक्त झालेल्या १४ टक्के लोकांना दुसऱ्यांदा संक्रमणाला सामोरं जावं लागू शकतं.

वाचा :लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल करोना संक्रमित
वाचा :मृत प्रवासी मजुरांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई? सरकारनं दिले ‘हे’ उत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *