ankita lokhande troll: हिंदू देवतांचा अपमान; अंकिता लोखंडेला नेटकऱ्यांनी झापलं – ankita lokhande trolled by netizens for wearing om printed pajama


मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अंकितानं सुशांतसाठी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते. फक्त अंकिताचे चाहते नव्हे तर सुशांतच्या चाहत्यांकडून अंकिताच्या पोस्टचं कौतुक केलं जातं. पण अंकितानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत, त्यावरून तिच्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

अंकिताला तिच्या नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमुळं ट्रोल करण्यात येत आहे. अंकिताला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचं कारण म्हणजे तिनं या फोटोंमध्ये परिधान केलेले कपडे. खरं तर अंकितानं हे फोटो तिची हेअरस्टाईल दाखवण्यासाठी केले होते.अंकिताच्या आईनं लहान लहान वेण्या घालून तिची हेअरस्टाईल केली आहे. पण या फोटोंमध्ये तिनं ‘ओम’ प्रिंट असलेला पायजमा घातलाय. पायजम्यावर हिंदू धर्मातील शुभ आणि देवाचं प्रतिक असलेलं ओम चिन्ह आहेच, त्याचसोबत काही मंत्र लिहिलेले आहेत.त्यामुळं असे कपडे घातल्यानं हिंदू देवतांचा अपमान झाल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
असल्या लोकांना उत्तर देणं गरजेचं …उर्मिला मातोंडकरचा कंगनावर निशाणा


दरम्यान दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासाला वेगळं वळण लागलं आणि एनसीबीनं रिया चक्रवर्ती हिला अटक केली. रियाला अटक केल्यानंतर तिची मैत्रिण शिबानी दांडेकर हिनं सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्यावर निशाणा साधला होता. अंकिता काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी रियावर आरोप करत असल्याचं म्हटलं आहे. अंकितावर टीका केल्यानंतर मात्र शिबानीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. सुशांत आणि अंकिताच्या चाहत्यांनीच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी अंकिताची बाजू घेत शिबानीला सुनावलं आहे.
रिया चक्रवर्तीचा सात वर्ष जूना ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल
अंकितासाठी शिबानीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, ‘ही बाई दोन सेकंदाच्या प्रसिद्धीच्या शोधात आहे. याचसाठी ती रियाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. ती स्वतः सुशांतसोबतच्या नात्यात आलेल्या अडचणींना तोंड देऊ शकली नव्हती. तिला असं करण्यास सांगितलं जात आहे.’ यानंतर अनेक टीव्ही सृष्टीतील कलाकार अंकिताच्या समर्थनार्थ पुढं आले आहेत. अभिनेत्री रश्मी देसाई हिनं देखील अंकितासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ‘अंकिता तू मोठी स्टार आहेस.तूझ्या प्रत्येक रुपात प्रेक्षकांनी तुला प्रेम दिलं आहे. तुला कुणालाही काहीही सांगायची किंवा काहीही सिद्ध करण्याची गरज नाहीए’, असं रश्मीनं म्हटलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *