Shane Warne: IPL2020: राजस्थानच्या संघासाठी धावून आला महान फिरकीपटू शेन वॉर्न – ipl2020: australian legendary spinner shane warne will be mentor of rajasthan royals


ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नची पुन्हा एकदा आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या संघात एंट्री झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. वॉर्न आणि राजस्थान यांचे अनोखे नाते आहे. कारण वॉर्न हा राजस्थानच्या संघाबरोबर बरीच वर्षे जोडला गेलेला होता. त्यामुळे आता जेव्हा राजस्थानला गरज असताना वॉर्न हा संघासाठी धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. पण वॉर्न संघात नेमके काय काम करणार, पाहा…

वाचा-IPL2020:महेंद्रसिंग धोनी देणार सर्व संघांना धक्का, पाहा मास्टरस्ट्रोक

वॉर्नने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सांभाळले होते. संघात जास्त नावाजलेले खेळाडू नसताना वॉर्नने युवा खेळाडूंची एक मोट बांधली होती. त्याचबरोबर कल्पक नेतृत्वाच्या जोरावर वॉर्नने राजस्थानला जेतेपद पटकावून दिले होते. पण त्यानंतर वॉर्नने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

वाचा- IPL2020: बीसीसीआयने बंदी घातलेल्या प्रवीण तांबेला केकेआरच्या संघात स्थान

क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर वॉर्नने संघाच्या मार्गदर्शकाची भूमिकाही वठवली होती. पण त्यानंतर वॉर्न राजस्थानच्या संघातून बाहेर पडला होता. त्यानंतर वॉर्न हा राजस्थानच्या संघाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होता. त्यानंतर वॉर्नचा संघाशी थेट संबंध आला नव्हता. पण वॉर्न गेल्यानंतर राजस्थानला एकदाही जेतेपद मात्र पटकावता आले नव्हते. त्यामुळे आता पुन्हा एकदा राजस्थानच्या संघासाठी वॉर्न धावून आल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-मुंबई इंडियन्ससाठी ‘ही’ आहे मोठी डोकेदुखी, संघाला होऊ शकते मोठे नुकसान

राजस्थानच्या संघात काय करणार वॉर्न
वॉर्न राजस्थानच्या संघात आला असला तरी तो काय करणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. वॉर्नने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे वॉर्न आता राजस्थानच्या संघातून खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. राजस्थानच्या संघाने वॉर्नला आता मार्गदर्शक (मेंटॉर) या पदासाठी आपल्या संघात घेतलेले आहे. राजस्थानच्या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद अँण्ड्र्यू मॅकडोनॉल्ड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे वॉर्न हा मॅकडोनॉल्ड यांच्याबरोबर एकत्रितपणे काम करणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *