Sassoon Hospital: Sassoon Hospital: ‘या’ तारखेनंतरच ससून रुग्णालयात नवीन रुग्णांना प्रवेश – sassoon hospital unable to take new admissions till september 23 says divisional commissioner saurabh rao


पुणे: ससून रुग्णालयाच्या ११ मजली इमारतीतील ऑक्सिजन पुरवठ्यातील यंत्रणेचे काम २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यानंतरच या रुग्णालयात नव्याने करोना बाधित रुग्ण दाखल करून घेतले जाणार आहेत. ससून रुग्णालयात दररोज सरासरी ५० करोना बाधित रुग्ण हे दाखल होत असतात, हे रुग्ण आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे दोन्ही जम्बो सेंटर, बाणेर येथील सेंटर आणि डी. वाय. पाटील रुग्णालयांमध्ये विभागून पाठविण्यात येणार आहेत. (Sassoon Hospital Latest News )

ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीत सुमारे पाचशे रुग्णांसाठी कोविड रुग्णालय आहे. गेल्या आठवड्यात ऑक्सिजन पुरवठ्याच्या यंत्रणेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आल्याने ससून प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यानंतर जम्बो सेंटरमध्ये ससूनमधील रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दर्शविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वाची माहिती दिली. ससूनमधील काम २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याने तोपर्यंत जम्बो सेंटरमध्ये रुग्ण दाखल करून घेतले जाणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

राव म्हणाले, ‘ऑक्सिजन पुरवठ्याच्या यंत्रणेतील दुरुस्तीचे काम हे २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतरच या रुग्णालयांत नव्याने रुग्ण दाखाल करून घेतले जाणार आहेत. रुग्ण दाखल करून घेण्याबाबत नव्याने ‘मायक्रो प्लॅनिंग’ करण्यात आले आहे. ससूनमध्ये दररोज सरासरी ५० रुग्ण हे दाखल होत असल्याची माहिती ससूनच्या अधिष्ठातांनी दिली आहे. त्यानुसार संबंधित ५० रुग्ण हे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील जम्बो सेंटर, आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील अण्णासाहेब मगर मैदानावरील जम्बो सेंटर, बाणेर येथील सेंटर, ऑटो क्लस्टर येथील सेंटर आणि डी. वाय. पाटील रुग्णालय येथे विभागून पाठविण्यात येणार आहेत.’

७०० खाटा वाढल्या

‘रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांत ७०० खाटा उपलब्ध झाल्या आहेत. या खाटा आयसीयू आणि ऑक्सिजनयुक्त आहेत. खाटांचा तुटवडा असल्याने खासगी रुग्णालयांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवण्यात येत आहे’, असे राव यांनी स्पष्ट केले.

पुण्यात ६५०० खाटा

‘सध्या पुण्यात आयसीयू आणि ऑक्सिजनयुक्त ६५०० खाटा आहेत. त्या ठिकाणी दाखल असलेल्या रुग्णांपैकी ४४०० रुग्ण पुण्यातील असून, २१०० रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. २६ ऑगस्टपासून जिल्ह्याबाहेरील रुग्ण हे वाढले आहेत’, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *