Sanjay Raut Reaction On Jaya Bachchan Statement – जया बच्चन चुकीचं काय बोलल्या?; राऊतांचा सवाल


मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतने समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जया बच्चन यांचं समर्थन केलं आहे. जया बच्चन चुकीचं काय बोलल्या?, ड्रग्स कनेक्शनमध्ये केवळ महाराष्ट्राचंच नाव का घेतलं जात आहे? , असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला आहे. जया बच्चन यांनी संपूर्ण देशाची भावनाच संसदेत मांडली आहे. आज संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री गप्प आहे. लोकांनी बोलूच नये असं वातावरण तयार करण्यात आलं आहे. अशा प्रकारचं वातावरण आणिबाणीच्या काळात होतं. आताही लोक बोलण्यास धजावत नाही. पण आणिबाणीतही अनेक कलाकार रस्त्यावर आले होते. किशोर कुमार हे त्यापैकी एक होते, असं राऊत म्हणाले.

ड्रग्स तस्करी रोखणंही केंद्राचीही जबाबदारी आहे. ड्रग्सचे काळेधंदे रोखण्यासाठी राष्ट्रीय एजन्सी निर्माण करण्यात आलेली आहे. प्रत्येकवेळी केवळ महाराष्ट्राचं नाव घेतलं जात आहे. यूपी, बिहार आणि नेपाळहून ड्रग्स येतं, असं सांगतानाच ड्रग्सबाबत जे लोक बोलत आहेत. स्पोर्ट्समध्ये होते त्याप्रमाणे त्यांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे, असंही राऊत यांनी सांगितलं.

कृतघ्न! जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशन यांच्यावर निशाणा

‘सुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोलला असता का?’

जया बच्चन काय म्हणाल्या होत्या?

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी ‘सिने उद्योगाला बदनाम करण्याच्या कथित षडयंत्रा’संबंधी राज्यसभेत शून्यकाळ नोटीस दिली होती. याविषयी बोलताना सदनात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. ‘जेव्हाही देशात एखादी समस्या येते, त्यावेळी बॉलिवूडचेच लोक सर्वात आधी मदतीसाठी पुढे येतात. सिनेसृष्टीची प्रतिमा डागाळताना पाहून अतिशय पीडा होत असल्याचं’ जया बच्चन यांनी म्हटलं होतं. ‘सिनेसृष्टीशी संबंधितत एका कलाकारानंच संसदेत उद्योगाविरुद्ध मतं मांडली आहेत. हे निंदनीय आहे’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन यांच्यावर निशाणा साधला होता.

लोकसभेत सोमवारी ‘बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर’ या मुद्यावरही चर्चा झाली. भाजप खासदार रवी किशन यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यावरून जया बच्चन यांनी त्यांचं नाव न घेता ‘लोग जिस थाली में खाते हैं उसमें ही छेद कर रहे’ असं म्हणतानाच ‘काही लोकांमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला दोष देता येणार नाही’ असंही जया बच्चन यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते तर… कंगनाची टिव टिव सुरूचSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *