sangli crime: Sangli Crime: करोना बाधित सोनाराचे बंद घर चोरट्यांनी फोडले; दहा लाखांचे सोने लंपास – rs 10 lakh worth of gold stolen from covid 19 positive jewelers house


सांगली: करोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी सांगलीत गेलेल्या सराफाचे भिलवडी (ता. पलूस) येथील बंद घर चोरट्यांनी फोडले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी घरातील दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. भिलवडीतील मध्य वस्तीत घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ( Sangli Crime Latest News )

वाचा: पुणे: मैत्रिणीसोबत टेकडीवर फिरायला गेला, डोळ्यांत मिरची पूड टाकून लुटले

भिलवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलूस तालुक्यातील भिलवडी येथील श्री राम ज्वेलर्सचे मालक श्रीराम पोतदार, तसेच त्यांचे वडील सुरेश पोतदार यांच्यासह कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे हे कुटुंब उपचारासाठी सांगलीत आहे. घरात कोणीच नसल्याने घर कुलूपबंद आहे. चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरीतील सुमारे पाचशे ते सहाशे ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवरती डल्ला मारला. चांदीच्या कोणत्याही दागिन्यांना चोरट्यांनी हात लावला नाही. चोरट्यांनी लांबवलेल्या दागिन्यांची किंमत ९ लाख ९१ हजार ५०० रुपये एवढी असून, रोख रक्कम १५ हजार रुपये असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

वाचा: बाप रे! आज महाराष्ट्रात ५१५ करोनाबळी; सांगा या संसर्गासोबत कसं जगायचं?

दरम्यान, भिलवडी पोलिसांना याची माहिती मिळताच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, सायंकाळपर्यंत चोरट्यांचे धागेदोरे मिळाले नाहीत. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग हे करीत आहेत. भारतीय स्टेट बँकेच्या समोर दाटवस्तीमध्ये असलेल्या या इमारतीमध्ये रात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याने भिलवडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाचा: मोटार वाहन करात ५० टक्के सूट; पाहा कोणाला मिळणार सवलत?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *