Sadashiv Patil: टीम इंडियात खेळलेल्या कोल्हापूरच्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन, BCCIने केले ट्विट – former indian cricketer and former captain of maharashtra cricket team s.r. patil passed away at the age of 87


कोल्हापूर: माजी भारतीय क्रिकेटपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सदाशिव रावजी उर्फ एस.आर. पाटील यांचे मंगळवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. भारतीय संघात खेळलेले ते एकमेव कोल्हापूरचे क्रिकेट खेळाडू होते.

वाचा- IPL: २१ क्रिकेटपटू कधी येणार, या संघांना कर्णधाराशिवाय खेळावे लागणार
वाचा- IPL 2020: मुंबईच्या खेळाडूंसोबत अर्जुन तेंडुलकर; चाहते म्हणाले हा तर ‘नेपोटिज्म’

एस.आर.पाटील यांनी मध्यमगती गोलंदाज म्हणून छाप पाडली. क्रिकेटची पंढरी असलेल्या इंग्लंडमधील लँकेशायर, नॉर्थस्टॅपोर्डशायर आणि नॅन्टविच या क्रिकेट क्लबकडून खेळताना फलंदाजी आणि गोलंदाजीत ठसा उमटवला. महाराष्ट्र रणजी संघात प्रतिनिधीत्व करताना त्यांनी भारतीय संघ निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. दोन डिसेंबर १९५५ मध्ये मुंबईत भारत आणि न्यूझीलंड या सामन्यांसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली. कर्णधार पॉली उम्रिगर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना न्यूझीलंडचा धोकादायक खेळाडू जॉन रिड याला दोन्ही डावात बाद केले.

वाचा- IPL मधील ८ कर्णधार; जाणून घ्या सर्वात यशस्वी कोण

वाचा- IPL सोडून गल्ली क्रिकेट खेळत आहेत धोनी आणि रोहित शर्मा; पाहा व्हिडिओ

भारतीय संघात निवड होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राकडून १९५२ ते १९६४ या कालावधीत खेळताना ३६ सामन्यात तीन अर्धशतकासह ८६६ धावा केल्या. तसेच ३०.६६ सरासरीने ८३ बळी मिळवले. ३८ धावात पाच बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली. भारतीय संघाचे दरवाजे बंद झाल्यावरही त्यांनी महाराष्ट्र संघाकडून खेळणे सुरू ठेवले होते. १९६२ मध्ये ते महाराष्ट्र संघाचे कर्णधार होते.

वाचा- क्रिकेट बोर्डाचा हैराण करणारा निर्णय; खेळाडूंकडून मागितले करोना टेस्टचे पैसे

२०१७ मध्ये जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. व्यवसायिक खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली. ते जे.आर.डी. टाटा यांच्या स्वदेशी मिल मध्ये ३६ वर्षे कार्यरत होते

वाचा- काही कळायच्या आत बोल्ड झाला; पाहा सामन्याचा निकालच बदलणारा VideoSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *