retired navy officer attack: निवृत्त नौदल अधिकारी मारहाण: ‘त्या’ ६ शिवसैनिकांना पुन्हा केली अटक – mumbai 6 shiv sena party workers arrested again for retired navy officer attack case


मुंबई: निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केल्याप्रकरणी जामिनावर सुटका झालेल्या सहा शिवसैनिकांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. कलम ४५२ (बेकायदा घरात घुसणे) आदी कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना आज, मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्यानं शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. कांदिवलीतील समतानगर भागात शुक्रवारी ही घटना घडली होती. या प्रकरणी शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुखांसह सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना शनिवारी जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, त्या सहाही जणांना पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

निवृत नौदल अधिकाऱ्याला मारहाण, कंगना म्हणाली…

काय घडलं होतं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याने शिवसैनिकांनी ६२ वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर हल्ला केला होता. कांदिवलीतील समतानगर भागात ही घटना घडली होती.या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत शर्मा यांच्या चेहऱ्याला तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. मदन शर्मा यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये शिनसेनेचे दोन शाखाप्रमुखही होते. शनिवारी त्यांना कोर्टाने जामीन दिला होता.

CM ठाकरेंचे कार्टून फॉरवर्ड केले; निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर शिवसैनिकांचा हल्ला

Sanjay Raut: निवृत्त नौदल अधिकाऱ्यावरील हल्ला; शिवसेनेने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

मदन शर्मा मारहाण: राज्य सरकारची भूमिका संशयास्पद; भाजपचा आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *