Rajnath Singh: Rajnath Singh Statement In Lok Sabha Parliament – अवघा देश वीर जवानांसोबत उभा आहे : राजनाथ सिंह


नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात लोकसभेत लडाखच्या मुद्यावरून भारत – चीन सीमावादावर अधिकृतपणे भारताची भूमिका मांडली. ‘सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र (Time Tested Mechanism) आहे, ज्यामध्ये केंद्रीय पोलीस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लडाख दौरा करून भारतीय जवानांची भेट घेतली आणि समस्त देशवासी आपल्या वीर जवानांसोबत उभे आहेत, हा त्यांना संदेशही दिला’ असं राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं.

वास्तविक नियंत्रण रेषेबाबत भारत आणि चीनची भूमिका वेगवेगळी आहे. परंतु, एलएसीवर शांती राखली जाईल, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे

राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

वाचा :LIVE संसद : ‘लडाखमध्ये आव्हान, ही वेळ जवानांसोबत उभं राहण्याची’

‘जवानांचं संयम आणि शौर्याचं उदाहरण’

मी देखील लडाखला जाऊन आपल्या शूरवीरांसोबत काही वेळ व्यतीत केला. मलाही त्यांचं अदम्य साहस, शौर्य आणि पराक्रम जाणवला, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर चीनकडून सेनेची संख्या तसंच युद्ध सामग्रीच्या संख्येत वाढ दिसून आली. १५ जून रोजी चीनविरुद्ध गलवानमध्ये रक्तरंजित संघर्षात आपल्या जवानांनी बलिदान दिली आणि चिनी पक्षालाही मोठं नुकसान झालं. २९-३० ऑगस्ट रोजी पॅन्गाँग सरोवरच्या दक्षिण भागात यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय सेनेनं त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. द्विपक्षीय संबंधाचा चीनकडून अनादर झाल्याचं यातून स्पष्टपणे दिसतंय. वास्तविक नियंत्रण रेषेचा १९९३-१९९६ च्या करारात स्पष्ट रुपात स्वीकार करण्यात आलाय. परंतु, चीनकडून हा करार मोडण्यात आला, त्यांनी केलेल्या कारवाईमुळेच सीमेवर संघर्ष घडून आला. भारतीय जवानांनी जिथे संयमाची गरज होती तिथं संयम राखून तर जिथं शौर्याची गरज होती तिथं शौर्याचं उदाहरण दिलंय, असंही राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटलं.

चीननं ३८ हजार स्क्वेअर भूमीवर अनधिकृत ताबा मिळवलेला आहे. चीन अरुणाचल प्रदेशाच्या सीमेलगत जवळपास ९० हजार स्क्वेअर किलोमीटर भूमीवरही हक्क सांगत आहे

– राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

वाचा :कृतघ्न! जया बच्चन यांचा भाजप खासदार रवी किशन यांच्यावर निशाणा
वाचा :मी कृतघ्न नाही, जया बच्चन यांच्या वक्तव्यानं धक्का : रवी किशन

‘कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार’

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही चिनी परराष्ट्र मंत्र्यांना कराराचं पालन केलं तर शांती कायम राखली जाऊ शकते, हे सांगितलं. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आपल्या जवानांचा जोश आणि धैर्य मजबूत आहे. लडाखमध्ये आपण एका आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत आहोत आणि आपल्याला हा प्रस्ताव पारित करायला हवा की संपूर्ण सदन जवानांसोबत उभं आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

मे महिन्यात चीननं कोंकला, गोदरा आणि पॅन्गाँग सरोकवराजवळ काही कारवाया करण्याचा प्रयत्न केला. इथं भारतीय सेनेनं चीनला सडेतोड प्रत्यूत्तर दिलं. २९-३० ऑगस्टच्या रात्रीही चिनी कारवाईया भारतीय सेनेनं अगोदरच ओळखल्या आणि त्यांना प्रत्यूत्तरही दिलं

राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

वाचा :दुसऱ्यांदा उपसभापती : हरिवंश सिंह यांच्याविषयी जाणून घ्या…
वाचा :लडाखचे भाजप खासदार जामयांग सेरिंग नामग्याल करोना संक्रमित

राजनाथ सिंह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…

– एलएसी मान्य केली जावी, यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालंय

– कोणत्याही पक्षानं यथास्थितीचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नये. सर्व अटींचं दोन्ही पक्षाकडून पालन व्हायला हवं

– आता चीननंही हे मान्य केलंय की चर्चेद्वारे आणि शांतीपूर्ण मार्गानेच तोडगा काढला जावा

– वास्तविक नियंत्रण रेषेवर कोणतीही कारवाई द्विपक्षीय संबंधावर परिणामकारक ठरेल. करारात सीमेवर दोन्ही देश कमीत कमी सेना तैनात ठेवतील, असा उल्लेख आहे

– भारत आणि चीनच्या सीमेला ड्रगनकडून मानलं जात नाही. हे निर्धारण योग्य आहे, असं आमचं मत आहे. सीमा अद्यापही औपचारिक रुपात निर्धारित नाही, असं चीनचं म्हणणं आहे.

– सीमेवर सेनेचं अदम्य साहस आणि शौर्य आम्हाला माहीत आहे. दोन मिनिटे मौन पाळून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत

वाचा :दगाबाज चीन आता LAC वर फायबर केबल टाकतोय, भारतीय सुरक्षा यंत्रणा अॅलर्ट
वाचा :एकजूट होऊन जवानांसोबत उभे राहा, पंतप्रधानांचं आवाहन

राजनाथ सिंह लोकसभेत

राजनाथ सिंह लोकसभेतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *