Rajnath Singh: Monsoon Session of Parliament 2020 Live Updates – LIVE संसद अधिवेशन : भारत-चीन तणावाबद्दल राजनाथ सिंह देणार माहिती


नवी दिल्ली : आज भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारत आणि चीन दरम्यान वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सुरु असलेल्या तणावावर संसदेत माहिती देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर एकमेकांसमोर उभे आहेत. अनेक स्तरावर अनेक बैठका पार पडल्यानंतरही अजूनही तोडगा निघालेला नाही. विरोधकांकडून सरकारनं याविषयी अधिकृत माहिती देण्यासाठी दबाव टाकला जातोय. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री मंगळवारी लडाख सीमेवरच्या परिस्थितीबद्दल देशाला अधिकृत माहिती देणार असल्याचं समजतंय. (अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा)

Live अपडेट :

– शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करत डाव्या पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर निदर्शनं केली

– समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी ‘सिने उद्योगाला बदनाम करण्याचं कथित षडयंत्रा’संबंधी राज्यसभेत शून्यकाळ नोटीस दिलीय.

– आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस… आज राज्यसभेचं कामकाज सकाळी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत तर लोकसभेचं कामकाज दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत चालणार आहे.

– संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दुपारी ३.०० वाजता लोकसभेत भारत चीन तणावावर अधिकृत माहिती देणार आहेत.

– पूर्व लडाख भागात गलवान खोऱ्यात जून महिन्यात झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत – चीन संबंधातील तणावात भर पडली होती.

संबंधित बातम्या :
वाचा :दगाबाज चीन आता LAC वर फायबर केबल टाकतोय, भारतीय सुरक्षा यंत्रणा अॅलर्ट
वाचा :चीनने लडाखमध्ये सीमेवर कशी दगाबाजी केली? राजनाथ सिंह देणार संसदेत निवेदनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *