PM Narendra Modi: ‘शहरीकरण हे सध्याचे वास्तव, बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होते’ – br ambedkar was a big supporter of urbanisation said pm narendra modi


नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील विविध नागरी सुविधांच्या सात प्रकल्पांचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. यापैकी चार प्रकल्प पाणीपुरवठ्यासंबंधी आहेत. तर दोन प्रकल्प सांडपाण्याचे असून, एक नदी सुधारणेशी संबंधित आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी छठ पूजा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत राजकीय समीकरण सांधण्याचा प्रयत्न केला. यासबोतच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव याचं नाव घेता त्यांच्यावर टीका केली. स्वार्थी नीती आणि मतांचे राजकारणामुळे प्रशासनावर दबाव येतो आणि यामुळे समाजातील वंचित आणि शोषितांना त्याचे परिणाम भोगावे लागतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

शहरांमध्ये नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी कनेक्शन जोडण्याचे काम सुरू आहे. अमृत योजनेनुसार बिहारमधी १२ लाख कुटुंबाना शुद्ध पाणीपुरवठ्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत ६ लाख कुटुंबांना ही सुविधा मिळाली आहे. लवकरच इतर कुटुंबांनाही ही सुविधा उपलब्ध केली जाईल. शहरीकरण वेगाने होतं आहे आणि सध्याचे हे वास्तव आहे. फक्त आपल्याच देशात नाही तर संपूर्ण जगभरात झपाट्याने शहरीकरण सुरू आहे. शहरीकरण एक समस्या आहे, असं आपण काही दशकं मानत आले. माझ्या मते ही एक संधी आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ( BR Ambedkar ) शहरीकरणाचे महत्त्व त्याच काळात लक्षात आले होते. ते शहरीकरणाचे ( urbanisation ) मोठे समर्थक होते. गरीबांना सर्व सुविधा आणि संधी उपलब्ध होतील अशा शहरांची कल्पना त्यांनी त्यावेळी मांडली होती. म्हणजेच पुढे जाण्यासाठी अशा शहरांमधून तरुणांना अनेक संधी मिळतील. बिहारचे नागरीकही भारताच्या शहरीकरणात आपले योगदान देत आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी बिहारमधील १६ टक्के दलित मतांना सांधण्याचा प्रयत्न केला. बिहारमधील बहुतांश दलित मतं ही लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची एकगठ्ठा मतं समजली जातात.

‘नमामि गंगे’चा या योजनेचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. बिहारच्या जनतेचं गंगा नदीशी अतिशय जवळचं नातं आहे. गंगा नदी स्वच्छतेचा सकारात्मक परिणाम अनेक नागरिकांच्या जीवनावर दिसून येत आहे. गंगा नदी स्वच्छतेच्या दृष्टीने ६ हजार कोटी रुपयांच्या ५० हून अधिक योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. गंगा किनाऱ्या वसलेल्या सर्व शहरांचे सांडपाणी गंगेत मिसळण्यापासून रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी जलशुद्धीकरण आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट योजना सुरू केल्या जात आहेत. छठ पूजेचा सण लवकरच येत आहे. अशावेळी गंगेच्या स्वच्छ पाण्यात नागरिक स्नान करू शकतील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी ५४१ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विविध नागरी सुविधांच्या सात प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अवघा देश वीर जवानांसोबत उभा आहे : राजनाथ सिंह

मृत प्रवासी मजुरांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई? सरकारनं दिले ‘हे’ उत्तर

सात प्रकल्पांमध्ये सिवान नगरपरिषद आणि छपरा महापालिकेद्वारे ‘अमृत मिशन’अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा प्रकल्पामुळे स्थानिकांना चोवीस तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तसंच, ‘नमामि गंगे’अंतर्गत मुझफ्फरपूर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. ‘अमृत मिशन’ अंतर्गत मोदींनी मुंगर पाणीपुरवठा योजनेचंही उद्घाटन केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *