petrol price slash: खूशखबर; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी कपात – petrol diesel price slash second consecutive day


मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरणीने तेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात मोठी कपात केली. आज मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल दरात १७ पैसे आणि डिझेलमध्ये २२ पैशांची कपात केली. सोमवारी पेट्रोल १४ पैसे आणि डिझेल १५ पैशांनी स्वस्त झाले होते.

आर्थिक अनिश्चितता; जागतिक बाजारात सोन्याला झळाळी
आजच्या दर कपातीनंतर मुंबईत सोमवारी पेट्रोल दर प्रती लीटर ८८.२१ रुपये आहे. तर डिझेल ७९.०५ रुपये झाले आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.५५ रुपये असून डिझेलचा भाव ७२.५६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.५७ रुपये असून डिझेल ७७.९१ रुपये झाला आहे. कोलकात्यात पेट्रोल ८३.०६ रुपये आहे. डिझेल ७६.०६ रुपये प्रती लीटर झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलर प्रती बॅरलच्या आसपास आहे.

गुंतवणूक;’सप्टेंबर’मध्ये या शेअरमधील गुंतवणूक ठरेल फायदेशीर
पेट्रोलियम कंपन्यांनी मागील चार दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दर कमी केल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.देशात पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले.१६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला होता.

‘हॅपिएस्ट माइंड्स’IPO; ‘शेअर अलॉटमेंट’बाबत अशी मिळवा माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्के आहे. देशात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण करोनातून बरे होत आहेत. ‘गेल्या २४ तासांत ७७ हजार ५१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ८० हजार १०७ इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यांच्यातील फरक सातत्याने कमी होत आहे,’ असे आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. देशातील बरे झालेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तसेच तमिळनाडू या राज्यांतील रुग्ण ६० टक्के आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ९ लाख ८६ हजार ५९८ असून, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख ४६ हजार ४२७ इतकी झाली आहे.

वाचा : कर्जे झाली स्वस्त; सेंट्रल बॅंकेने केली व्याजदर कपात
आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

शहर पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
मुंबई ८८.२१ ७९.०५
दिल्ली ८१.५५ ७२.५६
चेन्नई ८४.५७ ७७.९१
कोलकाता ८३.०६ ७६.०६Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *