Neetu Kapoor Alia Bhatt Dance For Riddhima Kapoor Sahni Birthday Special – रिद्धिमा कपूरसाठी नीतू आणि आलियाने धरला ठेका, रणबीरची मिळाली साथ


मुंबई- ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्यांदा रिद्धिमा वडिलांशिवाय तिचा वाढदिवस साजरा करत आहे. असं असलं तरी रिद्धिमाची आई नीतू कपूर आणि आलिया भट्ट यांनी तिचा वाढदिवस खास करण्याची सारी तयारी केली. रिद्धिमाच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरसह आलिया भट्ट आणि नीतू कपूर, आदर जैन, अरमान जैन आणि बाकी कुटुंबातील मंडळीही रिद्धिमासाठी नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये सर्वजण ऋषी कपूर यांच्या प्रसिद्ध गाण्यावर ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.


डान्स करताना रणबीर आणि आलियाची जोडी मस्त दिसत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना रिद्धिमाने लिहिले की, ‘वाढदिवसाचं बेस्ट सरप्राईज. सर्वांचे आभार.’


यंदा रिद्धिमाने आपला वाढदिवस आलिया भट्ट, करिना आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत रात्री उशिरा साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *