Nagpur: श्वानाचे डोळे फोडले; नागपुरातील संतापजनक घटना – animal cruelty stray dog blinded in attack in nagpur


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: अज्ञात व्यक्तीने एका मादी श्वानावर हल्ला करून तिचे दोन्ही डोळे फोडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये संतापाची लाट असून, सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अमरावती मार्गावर बोले पेट्रोल पंपाजवळ एक मादी श्वान रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे लोकांना दिसले. याबाबत कळताच पशुप्रेमी अभिषेक तुरक, समीर उके, प्रतीक अरोरा, साहील हे घटनास्थळी पोहचले. या श्वानाच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त वाहात होते. हे पशुप्रेमी श्वानाला घेऊन डॉ. गौरी कानटे यांच्या पशू दवाखान्यात गेले. तेथे शस्त्रक्रिया करून श्वानाचे दोन्ही डोळे काढावे लागले. त्यामुळे अंध झालेल्या या श्वानाची जबाबदारी आता राइस टू टेल्स य संस्थेने घेतली आहे. ही संस्था या श्वानाची देखभाल करणार आहे. या घटनेनंतर पशुकल्याण अधिकारी अंजली वैद्यार, ईश्वर पोतदार, निकिता बोबडे, प्रतीक अरोरा, कल्याणी व अन्य पशुप्रेमी सीताबर्डी पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

हृदयद्रावक! ३ वर्षीय चिमुरडीला निर्दयी बापानं जमिनीवर आपटलं; जागीच मृत्यू

…तर करा तक्रार

मोकाट श्वान किंवा अन्य प्राण्यांना मारणे, जखमी करणे, त्यांना मारून टाकणे यावर कायद्याने बंदी आहे. त्याचप्रमाणे, पशुप्रेमींना मारहाण करणाऱ्यालाही शिक्षा होऊ शकते. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाच वर्षांचा कारावस व दंड होऊ शकतो. प्राण्यांवर अशाप्रकारे अत्याचार होत असतील तर नजीकच्या पोलिस स्टेशनला तक्रार करण्याचे आवाहन मानद पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बोधाने यांनी केले आहे.

समलिंगी संबंधांतून BMC कर्मचाऱ्याची हत्या; मृतदेह भिवंडीत पुरला

मुंबई हादरली; ५ वर्षीय मुलीला १० रुपयांचे आमिष, शेजाऱ्याने केला बलात्कार

समुद्रकिनारी सेल्फी काढण्यात आई दंग; लाट आली अन् डोळ्यांदेखत मुलगा वाहून गेलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *