Mumbai Indians Team Is Not Having International Spinner – मुंबई इंडियन्ससाठी ‘ही’ आहे मोठी डोकेदुखी, संघाला होऊ शकते मोठे नुकसान


गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदचा चौकार मारला होता. पण यावर्षी मात्र एका गोष्टीमुळे मुंबईच्या संघाची डोकेदुखी वाढेलली आहे. या गोष्टीमुळे मंबईच्या संघाचे या आयपीएलमध्ये नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

वाचा-IPL2020:महेंद्रसिंग धोनी देणार सर्व संघांना धक्का, पाहा मास्टरस्ट्रोक

सध्याच्या घडीला मुंबईचा संघ हा समतोल नसल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या संघात धडाकेबाज फलंदाज आहेत. चांगले अष्टपैलू क्रिकेटपटूही आहेत. त्याचबरोबर ३-४ चांगले वेगवान गोलंदाजही आहेत. पण जी गोष्ट युएईमधील खेळपट्ट्यांसाठी महत्वाची असते ती नक्कीच नसल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-विराट कोहलीनंतर ‘हा’ क्रिकेटपटू होऊ शकतो भारताचा कर्णधार

युएईमधील खेळपट्ट्या या फिरकी गोलंदाजीला पोषक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक संघाने आपल्या ताफ्यात नावाजलेले फिरकीपटू ठेवलेले आहेत. पण हीच गोष्ट मुंबईच्या संघात पाहायला मिळत नाही. कारण मुंबईच्या संघात एकही नावाजलेला फिरकीपटू नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

वाचा-IPL2020: बीसीसीआयने बंदी घातलेल्या प्रवीण तांबेला केकेआरच्या संघात स्थान

मुंबईच्या संघात कृणाल पंड्या आणि जयंत यादव हे दोघे कामचलाऊ फिरकीपटू आहेत. जयंत यादवला स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर कृणाल पंड्या बरेच दिवस क्रिकेटपासून लांब आहे. राहुल चहर हा संघासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो, पण राहुलकडे क्रिकेटचा मोठा अनुभव नाही. त्यामुळे मुंबईच्या संघाची फिरकी गोलंदाजीची बाजू उजवी दिसत नाही. त्यामुळे हाच मुंबईच्या संघासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा- काही कळायच्या आत बोल्ड झाला; पाहा सामन्याचा निकालच बदलणारा Video
मुंबईच्या संघाकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपाटून लांब होता. हार्दिक पंड्याही वर्षभर क्रिकेट खेळलेला नाही. मिचेल मॅक्लेघन, ट्रेंट बोल्ट, नॅथन कल्टन नाइल हे परदेशी तीन वेगवान गोलंदाज संघाचा भार सांभाळू शकतात. पण फक्त चार परदेशी खेळाडू एका वेळी खेळू शकतात, त्यामुळे या तिघांपैकी एकालाच संधी मिळेल, असे दिसत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *