Maratha reservation: ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ; ओबीसी नेत्यांचा इशारा – obc leaders oppose additional reservation in obc reservation for maratha


मुंबई: आमचा मराठा आरक्षणलाा विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. पण ओबीसींमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे.

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे. त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का देऊ नये, नाही तर संघर्ष अटळ राहील. संघर्ष होऊ नये आणि जातीय सलोखा कायम राहावा ही आमची भूमिका असून सरकारनेही हा सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा, असं शेंडगे यांनी केली आहे.

मराठा समाजाला एससीबीसीमध्ये घालण्याचं षडयंत्रं झालं आहे. आमचा त्याला विरोध असून सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकणार नाही. ही कल्पना पूर्वीच होती आणि आता तेच घडलंय, असंही ते म्हणाले. काही मराठा नेते ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करत असून त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचीही त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा निर्णय अनपेक्षित होता – उद्धव ठाकरे

यावेळी त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशाराही त्यांनी दिला. धनगर समाजासाठी ६ आणि ओबीसींसाठी ७४ वस्तीगृहे स्थापन करण्याची घोषणा राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली असून या घोषणेची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठा आरक्षण: ‘सरकारच्या विनंतीवरूनच सुनावणीपासून लांब राहिलो – कुंभकोणी’

‘सर्व नसते उद्योग भाजपवाल्यांनी महाराष्ट्रासाठी राखून ठेवले आहेत’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *