india china standoff: चिन्यांना लडाखच्या कडाक्याच्या थंडीतही चोख प्रत्युत्तर देणार, भारतीय लष्कराची तयारी पूर्ण – india china standoff indian army is ready to stand on lac all winter


नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये LAC वर चीनबरोबर वाढलेल्या तणावामुळे भारतीय लष्करानेही आपली तयारी पूर्ण केली आहे. लडाखमधील संपूर्ण हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत एलएसीवरील तैनातीसाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. यासाठी उबदार कपडे, रेशन, तंबू आणि हीटरची व्यवस्था केली आहे. याशिवाय सैन्याने इतर वस्तूंचा साठादेखील पूर्ण केला आहे. सर्व वस्तू आघाडीवरील चौक्यांवर पोहोचवण्यात आल्या आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने चीनला असा दिला इशारा

एलएसीवरील तैनाती दीर्घ काळ असावी, अशी आमची इच्छा नाही. पण परिस्थिती अशीच कायम राहिल्यास आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. चीनला प्रोटोकॉल पाळायचा असेल तर त्याने तो पूर्णपणे पाळला पाहिजे आणि सर्वत्र ठिकाणी त्याचे पालन केले पाहिजे. फक्त ठराविक प्रोटोकॉल पाळून चालणार नाही. भारतीय लष्कर कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे, असं लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. चीनने पँगाँग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर फिंगर भागात द्विपक्षीय कराराचं उल्लंघन केलं आहे. आणि आता पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील सर्व महत्त्वपूर्ण शिखरांवर जवानांची तैनाती करून भारतीय लष्कराने आपली बाजू भक्कम केली आहे, तर चीन आता प्रोटोकॉल पाळण्यास सांगत आहे.

भारतीय लष्कराची हाय-टेक व्यवस्था

रस्त्याद्वारे संपर्क तुटला तरीही भारताकडे अशी रणनीतिक विमानसेवा आहे जी भारतीय लष्कर आणि हवाई दल मिळून दिल्ली ते लडाख आणि फॉरवर्ड पोस्टसाठी दीड तासात सैनिकांना आणि साधन सामग्री पोहोचवता येईल. अलिकडेच रोहतांग बोगद्याचे उद्घाटन या महिन्यात होईल. त्यानंतर लडाखच्या सर्व भागात कुठल्याही हवामान जागोजागी रस्ते संपर्क होईल.

‘शहरीकरण हे सध्याचे वास्तव, बाबासाहेब आंबेडकर शहरीकरणाचे मोठे समर्थक होते’

‘संपूर्ण देश सैन्यासोबत, पण चीनविरोधात PM मोदी कधी उभे राहणार?’

एका जवानावर १.२ लाख रुपये खर्च

९००० ते १२००० फूट उंचीपासून तैनात असलेल्या सैनिकांना एक्सट्रीम कोल्ड क्लायमेट ( ECC ) कपडे दिले जातात आणि १२००० फूटांपेक्षा अधिक उंचीवर तैनात असलेल्या जवानांसाठी विशेष कपडे आणि पर्वतारोहण उपकरणे ( special clothing and mountaineering equipment ) पुरवली जातात. एका जवानाला एससीएमईसाठी सुमारे १.२ लाख रुपये खर्च येतो. एलएसीवर तैनात असलेल्या सर्व सैनिकांना कपड्यांसह सर्व आवश्यक वस्तू पोचवण्यात आल्या असून राखीव साठा पाठवण्याचे कामही सुरू आहे. सर्व तात्पुरता निवारा देखील तयार करण्यात आला आहे. आघाडीच्या चौक्यांवर तैनात असलेल्या जवानांना सामान्य रेशन व्यतिरिक्त विशेष रेशन दिलं जातं. अशा अतिउंचीवर भूक लागत नाही. पण जवानांना पोषण आणि आवश्यक कॅलरी मिळावी यासाठी रोज ७२ वस्तूंमधून, ते आपल्या आवडीची वस्तू निवडू शकतात, असं लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *