india china in un: UN मध्ये भारताची चीनवर मात; ECOSOC चा चार वर्षांसाठी सदस्य – india defeats china at un becomes member of ecosoc for four years


वॉशिंग्टन: भारताने चीनला संयुक्त राष्ट्र संघात जोरदार मात दिली आहे. भारताला संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इकॉनॉमिक अॅण्ड सोशल कौन्सिल (ECOSOC)च्या महिलांच्या समस्यांवरील आयोगाचे सदस्यत्व मिळाले आहे. भारताचा कार्यकाळ हा २०२१ पासून सुरू होणार असून २०२५ पर्यंत असणार आहे.

संयुक्त राष्ट्र संघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारताने प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इकॉनॉमिक अॅण्ड सोशल कौन्सिलचे (ECOSOC) सदस्यत्व मिळवले आहे. हे यश म्हणजे भारतात लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे दर्शवते.

वाचा: जाणून घ्या: हायब्रीड वॉर म्हणजे काय? अॅप बंदीने आळा बसणार?

या जागेसाठी भारतासह चीन आणि अफगाणिस्तानदेखील प्रयत्नशील होते. मात्र, भारताने आणि अफगाणिस्ताने बाजी मारली. समितीवर निवडणून येण्यासाठी ५४ पैकी २८ मतांची आवश्यकता होती. अफगाणिस्तानला ३९ आणि भारताला ३८ मते मिळाली. चीनला २७ मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत चीनच्या हाती अपयश आले. कमिशन ऑन स्‍टेटस ऑफ वुमन ही जागतिक पातळीवरील संस्था आहे. लैंगिक समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करते. या आयोगाची स्थापना २१ जून १९४६ मध्ये झाली होती.

वाचा: योशिदे सुगा होणार जपानचे नवे पंतप्रधान

वाचा: खरंच पाकिस्तानचे करोनावर नियंत्रण की झोलझाल?

कमिशन ऑन स्‍टेटस ऑफ वुमन महिलांच्या अधिकारांना, हक्कांसाठी प्रोत्साहन देते आणि जगातील महिलांची स्थिती अधोरेखित करतात. लैंगिक समानता आणि सबलीकरणासाठी मानके देखील तयार करण्यात येतात. या संस्थेत संयुक्त राष्ट्र संघाचे ४५ सदस्य असतात. यात आफ्रिका खंडातील १३, आशिया खंडातील ११, लॅटिन अमेरिकेतील ९, पश्चिम युरोप आणि पूर्व युरोपचे प्रत्येकी चार सदस्य देशांचा समावेश असतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *