gold rate rise in world market: आर्थिक अनिश्चितता; जागतिक बाजारात सोन्याला झळाळी – gold rate rise in world commodity market due to uncertainty


मुंबई :कोव्हिड-१९ चे वाढते रुग्ण आणि अर्थव्यवस्थेतील घसरण यामुळे जागतिक कमाॅडिटी बाजारावर परिणाम झाला आहे. सोमवारी स्पॉट गोल्डच्या दरात वाढ झाली तर कच्चे तेल व बेस मेटलने नकारात्मक चित्र दर्शवले. कच्च्या तेलाच्या मागणीतील घसरणीमुळे किंमतही घसरली. अमेरिका-चीनमधील तणावामुळे धातूंच्या किंमतीवर परिणाम झाला.

अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे स्पॉट गोल्डचे दर ०.८ टक्क्यांनी वाढले आणि सोन्याचा भाव प्रती औंस १९४५ डाॅलर झाला. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आर्थिक सुधारणेची आशा मावळत असून त्यामुळेच मौल्यवान धातूची मागणी वाढली असल्याचे गुंंतवणूकदारांवर परिणाम झाला कमाॅडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने कमकुवत कामगार बाजाराचे संकेत दिले. बेरोजगारीच्या वाढत्या आकडेवारीमुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याची मागणी वाढली.

वाचा : गुंतवणूक;’सप्टेंबर’मध्ये या शेअरमधील गुंतवणूक ठरेल फायदेशीर
कच्चे तेल: मागील आठवड्यात साथीचे वाढते प्रमाण आणि घटती मागणी यामुळे डब्ल्यूटीआय क्रूडच्या दरात ६ टक्क्यांची घट झाली. अमेरिकेच्या तेलसाठ्यात वाढ आणि डॉलरचे मूल्य वधारल्यामुळे तेलाचे दर घसरले. ४ सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात, अमेरिकी एनर्जी इनफॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (इआयए)च्या अहवालानुसार, तेलसाठ्यात २.० दशलक्ष बॅरलची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या मागणीतील घट लक्षात घेता, क्रूडचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या सौदी अरेबियाने ऑक्टोबर ममहिन्यासाठी आशियासाठी अधिकृत विक्री किंमत (ओएसपी) कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तेलाच्या किंमती घटल्या. सध्याच्या तेल बाजाराच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ओपेक व सहयोगींची १७ सप्टेंबर रोजी बैठक होईल. ऑगस्टपासून तेलाची वाढलेली मागणी लक्षात घेता, ओपेकने दररोज ७.७ बॅरलपर्यंत उत्पादन कपात सुरू आहे. अमेरिकेतील आखाती उत्पादनावर वादळाचे संकट आल्यामुळे क्रूडचे नुकसान कमी होईल.

कर्जे झाली स्वस्त; सेंट्रल बॅंकेने केली व्याजदर कपात
बेस मेटल्स: वाढत्या कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येमुळे तसेच अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्ततांमधील वाढत्या तणावामुळे मागील आठवड्यात एलएमई बेस मेटलने लाल रंगात स्थान मिळवले होते. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकी निवडणुकांनंतर चीनशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणण्याच्या सूचना अमेरिकी अध्यक्षांनी दिल्या आहेत. त्यामुळे दोन देशांमधील संबंध बिघडू लागल्याने औद्योगिक धातूंचे दर घसरले.

‘हॅपिएस्ट माइंड्स’IPO; ‘शेअर अलॉटमेंट’बाबत अशी मिळवा माहिती
धातूचा सर्वात मोठा ग्राहक असललेल्या चीनमध्ये ऑगस्ट २०२० मधील निर्यात वााढली असून त्यामुळे धातूच्या किंमतीतील नुकसान मर्यादित राहिले. चीनचे शुद्धिकरण केलेले झिंक उत्पादन २.८ टक्क्यांनी वाढले असूून ते ४५०,००० टनांवर पोहोचले. तर त्याचे निकेल उत्पादन १५ टक्क्यांनी वाढले. एलएमई कॉपरचे दर ०.७७ टक्क्यांनी घसरले. एलएमई अधिकृत गोदामातील तांबे यादीमुळे हे नुकसान झाले. चीनमधील वाढत्या मागणीमुळे तसेच एलएमई तांब्याच्या तेलसाठ्याक घट झाल्याने तांब्याच्या दरांना आधार मिळाला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *