durga pooja and fish: दुर्गापूजानिमित्त बांगलादेश भारताला देणार ‘ही’ भेट – bangladesh gift to india on durga puja to export 1475 tonnes of hilsa fish


ढाका: दुर्गापूजानिमित्त भारताला बांगलादेशकडून मोठी भेट मिळणार आहे. बांगलादेशच्या या भेटीमुळे पश्चिम बंगालमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांगलादेशकडून सद्भावनाच्या रुपाने यावर्षी दुर्गापूजानिमित्त १४७५ टन हिलसा मासे मिळणार आहे. बांगलादेश सरकारने नऊशे निर्यातदारांना मंजुरी दिली आहे. पुढील आठवड्यांपासून निर्यातीला सुरुवात होणार आहे.

बांगलादेशच्या वाणिज्य मंत्रालयाने १० सप्टेंबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या उपसचिव नर्गिस मुर्शिदा यांनी सांगितले की, भारताच्या नागरिकांसाठी आमच्याकडून ही भेट आहे. मागील वर्षी भारताला फक्त ५०० टन हिलसा मासे पाठवले होते. हिलसा हा बांगलादेशची राष्ट्रीय मासा आहे. भारतात विशेषत: पश्चिम बंगालमधील लोकांमध्ये हे मासे लोकप्रिय आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजाच्या काळात हिलसा माशाला मोठी मागणी असते.

वाचा: अरे देवा! माशीला मारण्याच्या नादात घरालाच आग लागली

बांगलादेशमध्ये याची किंमत जवळपास ८५० ते ९०० टका असते. हुगळी नदीच्या किनाऱ्यावर वाढते प्रदूषण आणि ठिकठिकाणी असलेल्या जाळ्यांमुळे या माशांनी आपले स्थान बदलण्यास सुरूवात केली. बंगालमधील नदीत हिलसा माशांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्याचे कारण प्रदूषण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रिटेल बाजारात माशांच्या किंमतीवरही परिणाम होत आहे. तज्ञांनुसार, २००२-०३मध्ये हुगळी नदीतून ६२ हजार ६०० टन हिलसा मासे पकडले होते. तर, जवळपास दीड दशकांनंतर (२०१७-१८) मध्ये हे प्रमाण २७ हजार ५३९ टन इतके झाले होते. तर, बांगलादेशमध्ये हिलसा माशांचे प्रमाण वाढले. या काळात १ लाख ९९ टनाहून पाच लाख १७ हजार टन इतक्या प्रमाणावर मासे पकडण्यात आले.

वाचा: करोना: तोंडावाटे आणि नाकातून देण्यात येणारी लस प्रभावी ठरणार!

वाचा: चीनची तंतरली; युरोपीयन देशांच्या प्रमुखांसोबत जिनपिंग यांची चर्चा

सध्या बांगलादेशमध्ये ७५ टक्के हिलसा मासे पकडले जातात. तर, म्यानंमारमध्ये १५ आणि भारत व इतर देशांमध्ये पाच टक्केच मासे आढळतात. हिलसा मासे ३० ते ४० फूटापेक्षा कमी पाण्यात प्रवेश करत नाहीत. हुगळी नदीत विविध कारणांमुळे नदीची खोली कमी होत चालली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *