CSK: चेन्नईचा ऋतुराज गायकवाड अजूनही करोना पॉझिटीव्ह, धोनीची चिंता वाढली… – ipl 2020: csk’s ruturaj gaikwad remains covid-19 positive


चेन्नई सुपर किंग्ज संघातील महाराष्ट्राचा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड अजूनही करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. ऋतुराजच्या काही करोना चाचण्या झाल्या आहेत. पण या सर्व चाचण्यांमध्ये ऋतुराज हा अजूनही पॉझिटीव्ह येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे.

वाचा-आयपीएलमधला ‘हा’ नियम बदला, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मागणी

चेन्नईच्या संघातील दीपक चहरलाही करोना झाला होता. पण दीपकची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्याला संघासोबत ठेवण्यात आले आहे. दीपक आणि ऋतुराज यांना एकाच वेळी करोना झाल्याचे पाहिले गेले होते. पण ऋतुराज मात्र अजूनही करोनामधून बाहेर पडू शकलेला नाही. दीपक आणि ऋतुराज यांना जेव्हा करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी दोघांनाही १४ दिवस क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंत दीपकच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला होता, तर ऋतुराजच्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

वाचा-मुंबई इंडियन्ससाठी ‘ही’ आहे मोठी डोकेदुखी, संघाला होऊ शकते मोठे नुकसान

याबाबत चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला ऋतुराज हा लवकरच बरा होईल, असा विश्वास आहे. ऋतुराजची सध्या केलेली करोना चाचणीही पॉझिटीव्ह आलेली आहे. घाबरण्याचे काही कारण नाही, कारण आमची वैद्यकीय टीम ऋतुराजच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ऋतुराज लवकरच फिट होईल, अशी आम्हाला आशा आहे.

वाचा- IPL2020:महेंद्रसिंग धोनी देणार सर्व संघांना धक्का, पाहा मास्टरस्ट्रोक

दीपक फिट झाल्यानंतर काही दिवसांमध्ये ऋतुराजही मैदानात उतरणार असल्याचे म्हटले जात होते. पण दीपकनंतर जेव्हा ऋतुराजची करोना चाचणी झाली तेव्हा ती पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे अजूनही ऋतुराज करोना पॉझिटीव्ह असल्याने चेन्नईच्या संघाची चिंता वाढली असल्याचे म्हटले जात आहे.

वाचा-विराट कोहलीनंतर ‘हा’ क्रिकेटपटू होऊ शकतो भारताचा कर्णधार

संघातील सदस्यांना करोना झाल्यावर सुरेश रैनाने युएई सोडून भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ऋतुराज हा रैनाची जागा घेऊ शकतो, असेही म्हटले जात होते. पण ऋतुराज अजूनही फिट झालेला नाही, त्यामुळे त्याचा विचार रैनाच्या जागेसाठी सध्याच्या घडीला होऊ शकणार नाही. ऋतुराजच्या करोना चाचणीचा अहवाल आल्यावर त्याला काही दिवस फिट होण्यासाठी द्यावे लागतील. त्यानंतर त्याला बायो बबल तंत्रज्ञानामध्ये सामील करण्यात येईल. त्यानंतर ऋतुराज हा संघाबरोबर सराव करू शकतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *