Cricket: पाहा चिमुकला ख्रिस गेल, भन्नाट षटकारांचा व्हिडीओ झालाय व्हायरल – aakash chopra post one video of little boy on social media and video became viral


वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचे नाव आठवले तर सर्वांनाच उत्तुंग षटकार आठवतात. आयपीएलमधील सर्वाधिक षटकारही गेलच्याच नावावर आहेत. पण आता एक चिमुकला गेलसारखी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. त्याच्या षटकारांचे व्हिडीओ आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

गेल ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार षटकार पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेलने एखादा जोरदार फटका खेचला की तो थेट सीमारेषेपार जातो, असे आपण बऱ्याचदा पाहिले आहे. या चिमुकल्याची फलंदाजी पाहतानाही गेलची आठवण आल्यावाचून चाहत्यांना राहत नाही. कारण या चिमुकल्यानेही मारलेले फटके लांबपर्यंत जात आहेत.


भारताचा क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा फलंदाजी करत आहे. या लहान मुलाचे वय जवळपास तीन वर्षे असल्याचे म्हटले जात आहे. तो डावखुरा फलंदाज आहे. हा लहान मुलगा चेंडूची लाईन आणि लेंथ बघतो आणि मोठ मोठे फटके लगावत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही गोष्ट फक्त एकदा किंवा दोनदा झालेली नाही.

वाचा-आयपीएलमधला ‘हा’ नियम बदला, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मागणी

या व्हिडीओमध्ये या मुलाला चार चेंडू टाकण्यात आले. चारही चेंडू वेगवेगळ्या लाईनवर टाकले होते. पण चारही वेळा या लहान मुलाने मोठे फटके मारल्याचे पाहायला मिळाले आहे. या फटक्यांमध्ये टायमिंग एवढे योग्य असल्याचे पाहायला मिळाले आहे की, चेंडू थेट लांब जात असल्याचेच दिसत आहे.

वाचा-IPL2020:महेंद्रसिंग धोनी देणार सर्व संघांना धक्का, पाहा मास्टरस्ट्रोक

या व्हिडीओमध्ये आकाशने समालोचनही केले आहे. हा लहान मुलगा कसे फटके मारतो, हे आकाशने या व्हिडीओमध्ये सांगतिले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओखाली आकाशने लिहिले आहे की, ” हा लहान मुलगा किती जोरदार फटके लगावत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना हॅल्मेट देण्याची वेळ आलेली आहे.” हा लहान मुलगा नेमका कोण आहे आणि त्याचे नाव काय, ही माहिती अजूनही पुढे आलेली नाही. आकाशनेही या लहान मुलाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *