स्नेहा उल्लाल बिग बॉस १४: ‘Bigg Boss 14’ मध्ये दिसणार ऐश्वर्या रायची डुप्लिकेट स्नेहा उल्लाल, पाहा कोण झालं कन्फर्म! – bigg boss 14 contestant sneha ullal along with karan patel aly goni


मुंबई- ‘बिग बॉस १४’ कधी येतोय याची चाहत्यांना उत्सुकता आहे. हळूहळू या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांच्या नावाचा अंदाज बांधला जात आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. पण याबद्दल अधिकृतरित्या कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असं असलं तरी निशांत मालकानी, मानसी श्रीवास्तव, जास्मिन भसीन, पवित्र पूनिया आणि आकांक्षा पुरी यांच्या नावाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

कंगना रणौतने नुकसान भरपाई म्हणून BMC कडे मागितले २ कोटी

करण पटेल

एकीकडे काही नावांबद्दल संभ्रम असला तरी काही सेलिब्रिटींच्या नावांची पुष्टी करण्यात आली आहे. करण पटेल, स्नेहा उल्लाल आणि अली गोनी ही तीन नावं बिग बॉस १४ मध्ये दिसतील हे जवळपास निश्चित आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत मिस्टर बजाजच्या भूमिकेत दिसणारा करण पटेल सुरुवातीला ‘बिग बॉस १४’ मध्ये जावं की नाही या निर्णयात गोंधळलेला होता. गेल्या वर्षी १३ व्या सीझनसाठी त्याला विचारण्यात आले होते. पण त्याने स्पष्ट नकार दिला होता.

बिग बॉस १४

एका इंग्रजी वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार करणने १४ व्या सीझनसाठी होकार दिला आहे. असं म्हटलं जातं की ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका लवकरच बंद होणार आहे. शोचा शेवटचा एपिसोड ३ ऑक्टोबरला दाखवण्यात येऊ शकतो. याचमुळे करणने बिग बॉस १४ च्या प्रस्तावाचा पुनर्विचार केला आणि आपला निर्णय बदलला.

सुशांतच्या जागी अभिषेकने आत्महत्या केली असती तर हेच बोलला असता का? कंगनाचा जया यांना प्रश्न


स्नेहा उल्लाल

‘बिग बॉस १४’ साठी स्नेहा उल्लालचं नावही समोर येत आहे. ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी म्हणून स्नेहाची ओळख आहे. सलमान खानच्या लकी-नो टाइम फॉर लव्ह या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता तिनेही बिग बॉससाठी होकार दिल्याचं म्हटलं जात आहे. बिग बॉस १३ मध्ये पंजाबी मॉडेल आणि अभिनेत्री हिमांशी खुराना स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी झाली होती. हिमांशीला ‘पंजाबची ऐश्वर्या राय’ म्हटले जाते.

बिग बॉस १४

अली गोनी

यावेळी अली गोनीचं नावही या सीझनसाठी समोर आलं आहे. करण पटेल आणि जास्मिन भसीन यांचा तो चांगला मित्र आहे. अली गोनीने करण पटेलसोबत ‘ये है मोहब्बतें’ या हिट मालिकेत काम केलं होतं. ‘स्पॉटबॉय’च्या अहवालानुसार अली गोनीला आर्थिक कारणांमुळे ‘बिग बॉस १४’ मध्ये भाग घ्यायचा नव्हता, परंतु त्याने आता ही ऑफर स्वीकारली आहे. नुकताच तो ‘खतरों के खिलाडी- मेड इन इंडिया’ मध्येही दिसला होता. शोमध्ये त्याच्यासोबत करण आणि जास्मीन भसीनसुद्धा होती.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *