कंगना रणौत: मुंबईत नाही तर मनालीत १० दिवसांसाठी क्वारन्टीन झाली कंगना रणौत – kangana ranaut home quarantine in her hometown manali for 10 days


मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मुंबईत पाच दिवस राहिली होती. यानंतर ती आपल्या मूळ घरी मनालीला परतली. सोम घालवल्यानंतर मनाली येथील आपल्या घरी परतली आहे. सोमवारी कंगनाने मुंबई सोडली. आता मनालीत पोहोचल्यावर कंगनाला १० दिवसांसाठी क्वारन्टीन रहावं लागणार आहे. विशेष म्हणजे मुंबईहून मनालीला जाण्यापूर्वी ती परतत असल्याची माहिती मनाली इथल्या आरोग्य विभागाला देण्यात आली होती.

कोविड- १९ प्रोटोकॉल अंतर्गत कंगनाला १० दिवस क्वारन्टीन व्हावं लागणार असल्याचं तिथल्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं. यासोबतच कंगनाची करोनाची चाचणी पुन्हा केली जाईल. मात्र ही चाचणी तातडीने न घेता सात दिवसांनी घेण्यात येणार आहे. या सात दिवसांमध्ये तिच्या करोनाची लक्षणं आढळून येतात का यावर नजर ठेवली जाणार आहे.

मनालीहून कुल्लूला गेली कंगना

मुंबईहून कंगना थेट चंदीगढ विमानतळावर पोहोचली. तिथून ती प्रथम रस्तामार्गे कुल्लूला पोहोचली. इथे रंगोलीचं घर आहे. काही वेळ तिथे राहिल्यानंतर कंगना परत मनालीला आपल्या घरी आली. दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारने कंगनाला जी सुरक्षा पुरवली आहे, ती २४ तास सुरूच राहणार आहे. क्वारन्टीन असतानाही या सुविधेत खंड पडणार नाही.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, कंगना परतल्यावर ते तिचं स्वागत करतील. कंगनाने आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित रहावे आणि आपले कार्य करत रहावे. यापूर्वी झालेल्या सर्व घटनांमुळे राज्याला मोठा त्रास सहन करावा लागला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं कंगना वादात सापडली होती. शिवसेनेसह राज्यातील सत्ताधारी पक्षांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. कंगनानंही शिवसेनेला आव्हान दिल्यानं हा वाद चिघळला होता. त्यात भाजप उघडपणे कंगनाच्या बाजूनं उतरल्यानं या साऱ्याला पूर्णपणे राजकीय स्वरूप आलं होतं. आता कंगना पुन्हा हिमाचलला परतल्यानं सत्ताधारी पक्षांनी तिच्यासह तिच्या समर्थकांवरही टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही कंगनाच्या बाजूने बोलणाऱ्यांना टोला हाणला आहे. ‘तुमची तोंडे काळी करून कंगना गेली, आता मारा बोंबा,’ असं त्यांनी म्हटलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *