Uttar Pradesh crime: हृदयद्रावक! ३ वर्षीय चिमुरडीला निर्दयी बापानं जमिनीवर आपटलं; जागीच मृत्यू – uttar pradesh crime 3 year old girl died after smashed on floor by her father in noida


नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पती-पत्नीच्या भांडणात रागाच्या भरात त्याने आपल्या ३ वर्षीय मुलीला जमिनीवर आपटलं. यात तिचा मृत्यू झाला. तर पत्नीला मारहाण केल्यानं ती गंभीर जखमी झाली आहे.

नोएडातील बरोला गावात रविवारी सकाळी ही भयंकर घटना घडली. नवरा-बायकोचं भांडण झालं होतं. त्याने रागाने मुलीला उचलून जमिनीवर आपटलं. यात गंभीर जखमी झाल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. मुलीच्या आईलाही बेदम मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली. ४९ सेक्टर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरोला गावात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. महिला गंभीर जखमी झाली होती. तर तिच्या शेजारीच ३ वर्षांची मुलगी मृतावस्थेत पडली होती. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिथे महिलेवर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली. पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, महिलेचा पती दारूच्या नशेत तिला नेहमी मारहाण करत असे. आदल्या दिवशीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अमित असे आरोपीचे नाव आहे. ते मूळचा बुलंदशहर जिल्ह्यातला आहे. तो नोएडात काम करतो. तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, घटनेनंतर तो पसार झाला आहे. त्याने पत्नीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. मुलीचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. मात्र, कारण सांगितले नाही. त्याने आपल्या सासरच्या मंडळींना चुकीची माहिती दिली. प्रथमदर्शनी अमितने मुलीची हत्या केली. तर पत्नीला बेदम मारहाण करून जखमी केल्याचे दिसते, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आणखी बातम्या वाचा:

धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

नागपूरमध्ये व्हाइटनरसाठी खून; बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

सुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शन; सातही दलालांना एनसीबीकडून अटक

पिंपरी: एटीएम गॅस कटरने कापला, अवघ्या १० मिनिटांत साडेनऊ लाख पळवले

करोना, होम क्वारंटाइनचा बहाणा; ‘शौकीन’ पतीला पत्नीने तरुणीसोबत रंगेहाथ पकडलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *