Sensex down: नफावसुलीने ब्रेक ; सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी गमावली – sensex drag down after surging 300 point in morning session


मुंबई : आशियातील सकारात्मक संकेतांनी आज सोमवारी बाजारात चैतन्य निर्माण केले होते. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने २०० अंकांची झेप घेतली. वित्त सेवा देणाऱ्या संस्था, बँका, ऑटो, एफएमसीजी आदी क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु झाला. या तेजीने सेन्सेक्स ३०० अंकांनी तर निफ्टी ९० अंकांनी वधारला होता. मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही.

विम्याची ई-पॉलिसी; करोना संसर्ग वाढल्यामुळे ‘इरडा’चा निर्णय
नफेखोरांनी दुपारनंतर शेअर बाजारात विक्रीचा मारा सुरु केला. ३०० अंकांनी वधारलेल्या सेन्सेक्सची पुन्हा घसरणीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ९७.९२ अंकांनी घसरून ३८७५६.६३ अंकांवर बंद झाला आणि निफ्टी २४.४० अंकांनी घसरून ११४४०.०५ वर बंद झाला. बाजारात एचडीफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी ,भारती एअरटेल,व्होडाफोन या शेअरमध्ये घसरण झाली. टाटा कम्युनिकेशन, टीसीएस, थायोकेअर टेक्नॉलॉजी, केपीटी इंडस्ट्रीज, इन्फोसिस, माइंडट्री, टेक महिंद्रा हे आयटी शेअर तेजीत होते.

सोने-चांदी महागले ; जाणून घ्या आजचा भाव
आज आशियात तेजीचे वातावरण होते. जपान, सिंगापूर आणि चीनमधील शेअर निर्देशांक वधारले. करोनाच्या संकटात जपानमधील पर्यटन व्यवस्थेला सावरण्यासाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निक्केई निर्देशांक ६२ अंकांनी वधारला होता. तसेच सिंगापूर एसजीएक्स निफ्टीत वाढ झाली. युरोपियन संघ आणि चीनमध्ये द्विपक्षीय व्यापाराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्हची वैठक होणार आहे. करोना संकटाची तीव्रता पाहता या बँका अर्थव्यवस्थेबाबत काय अंदाज वर्तवतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

आनंदाची बातमी; ही कंपनी देणार ३० हजार लोकांना नोकऱ्या, जाणून घ्या काय काम आहे
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने भांडवली बाजार नियंत्रक सेबीने (SEBI’s new circular on asset allocation for multicap funds) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सेबीने (Sebi) मल्टी कॅप (Multi Cap Funds) म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक नियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार आता फंड कंपन्यांना किंवा व्यवस्थापकांना पूर्वीसारखे मल्टी कॅप योजनेतील निधी केवळ लार्जकॅपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येणार नाही. त्याऐवजी ७५ टक्के निधी हा इक्विटी आणि इक्विटीशी संबधित गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवावा लागेल. याआधी ही मर्यादा ६५ टक्के होती. येत्या जानेवारीपासून ही नियमावली लागू होणार आहे. दरम्यान, या नव्या सुधारणेचे पडसाद सोमवारी बाजारात उमटतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *